महाराष्ट्रात २८८ जागांसाठी ०९ कोटी ७० लाख मतदार ४१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरविणार...*
महाराष्ट्रात बुधवार,२० नोव्हेंबर रोजी मतदानाला सुरुवात झाली असून राज्यातील ०९ कोटी ७० लाख मतदार २८८ जागांसाठी निवडणूक लढवत असलेल्या ४१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. यामध्ये २०४ महिला उमेदवार आहेत. निवडणुकीच्या रिंगणात भाजप १४९, काँग्रेस १०१, शिवसेना उद्धव ठाकरे ९५, शिवसेना शिंदे ८१, राष्ट्रवादी शरद पवार ८६, राष्ट्रवादी अजित पवार ५९, मनसे १२५, वंचित बहुजन आघाडी २०० तर अपक्ष २०८६ असे उमेदवार रिंगणात आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघातही याचवेळी पोटनिवडणूक होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत आहे. राज्यात ९९० केंद्र संवेदनशील असून ०९ कोटी ७० लाख मतदारांपैकी ०४ कोटी ६९ लाख महिला, ०५ कोटी २२ हजार पुरुष, ०६ हजार १०१ तृतीयपंथी, ०६ लाख ४१ हजार अपंग मतदार आहेत. ९१ लाख १६ हजार सेवा मतदार देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.