पालघर जिल्ह्यात ०६ विधानसभा मतदारसंघ मिळून ६६.६३ टक्के इतके मतदान *

Date: 2024-11-22
news-banner
      *पालघर जिल्ह्यात ०६ विधानसभा मतदारसंघ मिळून ६६.६३ टक्के इतके मतदान *
     *२२ लाख ९२ हजार ०६६ मतदारांपैकी १५ लाख २७ हजार १२१ मतदारांनी केले मतदान *

           पालघर जिल्ह्यात ०६ विधानसभा मतदारसंघ मिळून ६६.६३  टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये  डहाणू मतदारसंघ: ७३.३४ टक्के, विक्रमगड मतदारसंघ : ७७.९५, टक्के, पालघर मतदारसंघ : ७१.५८ टक्के,, बोईसर मतदारसंघ : ६७.,५० टक्के, नालासोपारा मतदारसंघ :५७.३७ टक्के, ,वसई मतदारसंघ : ६१.४९ टक्के असे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान झाले आहे .
        सकाळी ०७ वाजता मतदान सुरू झाल्यानंतर दर दोन तासांनी निवडणूक आयोगामार्फत मतदानाची आकडेवारी दिली जात होती.सकाळी मतदानाची गती कमी राहिली. पहिल्या दोन तासानंतर जिल्ह्यातील ही मतदानाची आकडेवारी ०९ वाजेपर्यंत केवळ ०७.३० टक्के इतकी राहिली. पुढे अकरा वाजेपर्यंत ही आकडेवारी १२.१० टक्क्यांनी वाढत, दुपटीहून अधिक होत, १९.४० टक्के इतकी पोचली. तदनंतर १४ टक्के इतकी वाढ होत,  एक वाजेपर्यंत ३३.४०  टक्के मतदान झाले होते. तर तीन वाजेपर्यंत १३.४२ टक्के इतकी वाढ होऊन, मतदानाची ही आकडेवारी ४६.८२ टक्के राहिली .पुढे पाच वाजेपर्यंत १२.४९ ,टक्के इतकी वाढ नोंदवत, मतदान ५९.३१ टक्क्यावर पोचले आणि सहा वाजता व मतदानासाठी रांगा लागून राहिल्यामुळे मतदान उशिरापर्यंत सुरू राहिल्याने अखेरीस मतदानाची जी आकडेवारी आली त्यामध्ये,शेवटी ६.६५ टक्के इतकी वाढ नोंदवत, जिल्ह्याचे सरासरी मतदान ६५.९५ इतके टक्के राहिल्याची माहिती मतदानाच्या दिवशी रात्री देण्यात आली. मात्र निवडणूक प्रशासनामार्फत २१ नोव्हेंबर रोजी दुपारी अंतिम आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानुसार ६६.६३ टक्के म्हणजेच २२ लाख ९२ हजार ०६६ मतदारांपैकी १५ लाख २७ हजार१२१ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
          यामध्ये विधानसभानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे राहिली आहे.
१२८-डहाणू  : ७३.३४ टक्के
१२९-विक्रमगड  : ७७.९५ टक्के
१३०-पालघर  : ७१.५८ टक्के
१३१-बोईसर  : ६७.५० टक्के
१३२-नालासोपारा : ५७.३७ टक्के
१३३-वसई  : ६१.४९ टक्के

Leave Your Comments