* लाडकी बहीण योजना असूनही जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघ वगळता सर्व मतदारसंघात महिलांचे मतदानाचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमीच*
*महिला मतदार भवितव्य ठरविणार काय ?*
लाडकी बहिणी योजनेद्वारा महिला मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न महायुतीतर्फे करण्यात आला तसेच महायुतीच्या प्रचार सभांना महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली, त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला असला तरी पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात ११ लाख ०४ हजार २४६(४८.१७%) महिला मतदारांपैकी ७ लाख ३९ हजार ९६१ (४८.४५ टक्के) महिला मतदारांनी आपला हक्क बजावला तर प्रत्यक्ष मतदान झालेल्या १५ लाख २७ हजार १२१(६६.६३टक्के) मतदारांपैकी ०७ लाख ३९ हजार ९६१(४८.४५ टक्के) मतदारांनी आपला बजावल्याने हे वास्तव समोर आले आहे.या तुलनेत,एकूण मतदारात, ११ लाख ८७ हजार ५८९(५१.८१) इतक्या संख्येने असलेल्या,पुरुष मतदारांपैकी ७ लाख ८७ हजार ०८८ (५१.५४) पुरुष मतदारांनी आपला हक्क बजावला.
*जिल्ह्यातील केवळ डहाणू विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांचे प्रमाण (५१.५२ टक्के)इतके आहे.उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघात हे प्रमाण ५० टक्क्यांच्या खालीच राहिले आहे.
*जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघात महिलांचे मतदान सर्वात कमी (४६.४०टक्के)इतके झाले असून, येथे पुरुषांचे मतदान(५३.६० टक्के ),त्यानंतर नालासोपारा मतदारसंघात त्या खालोखाल (४६.४३ टक्के )महिलांनी मतदान केले आहे.येथे पुरुषांचे मतदान (५३.५६ टक्के) झाले आहे.विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महिला मतदानाचे प्रमाण ४९.७८ टक्के तर पुरुष मतदानाचे प्रमाण ५०.२२ टक्के राहिले आहे.पालघर विधानसभा मतदारसंघात महिला मतदानाचे प्रमाण ४९.३९ टक्के तर पुरुष मतदानाचे प्रमाण ५०.६० टक्के राहिले आहे.वसई विधानसभा मतदारसंघात महिला मतदानाचे प्रमाण ४८.७९ टक्के तर पुरुष मतदानाचे प्रमाण ५१.२१ टक्के राहिले आहे.
*जिल्ह्यात बोईसर विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदानाचे प्रमाण सर्वाधिक ५३.६० टक्के, तर नालासोपारा मतदारसंघात ५३.५६टक्के, वसई ५१.२१ टक्के, पालघर मतदारसंघात ५०.६० टक्के, विक्रमगड मतदारसंघात ५०.२२ टक्के व सर्वात कमी ४८.४८ टक्के इतके राहिले आहे.
सहाही विधानसभा मतदारसंघ मिळून पुरुष मतदानाचे हे प्रमाण ५१.५४ टक्के इतके असून महिला मतदानाचे प्रमाण ४८.४५ टक्के इतके राहिले आहे.साहजिकच महिला मतदार विधानसभा निवडणुकीचे भवितव्य ठरविणार, असल्याचे सांगितले जात आहे, हे प्रत्यक्षात येणार किंवा कसे हे पहावे लागेल.