वार्षिक सर्वसाधारण ६४ कोटी,
आदिवासी घटक ७५ कोटी,
अनु.जाती ०६ कोटी अखर्चित
२०२३ - २४ वर्षासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला ग्रामविकासासाठी वितरित १७ कोटी ९ लाख ९० हजार पैकी केवळ ०७ कोटी ०५ हजार म्हणजे ४५ टक्के इतकाच निधी खर्च झाला तर लघुपाटबंधारे अंतर्गत बांधकाम व दुरुस्तीसाठी वितरित ०७ कोटी ७९ लाख ९८ हजार पैकी केवळ ०१ कोटी ७३ लाख ०१ हजार म्हणजेच २२ टक्के इतकाच खर्च झाला आहे व कोल्हापूर पद्धतीचे बंधार्याच्या बांधकामासाठी वितरित ०३ कोटी ८० लाखापैकी ०२ कोटी १९ लाख दोन हजार म्हणजे ५८ % इतका खर्च जिल्हा परिषदेने केला आहे.
याच अंतर्गत मेरीटाईम बोर्डाकडे बंदराचा विकास व प्रवासी बंदरालगतच्या सुखसोयी यासाठी वितरित १० कोटी २० लाख ९४ हजारपैकी केवळ दोन कोटी सात लाख ४२ हजार म्हणजेच २० टक्के इतकाच खर्च केला आहे. मार्ग व पूल या शीर्षक अंतर्गत १३ कोटी ७४ लाख १२ हजार पैकी केवळ ७८ टक्के म्हणजेच १० कोटी ६७ लाख ३९ हजार इतकाच खर्च झाला आहे. यामध्ये इतर जिल्हा रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण यावर केवळ ३७ टक्के ( २ कोटी ९६ लाख ९८ हजार पैकी एक कोटी ०२ लाख ५१ हजार) खर्च जिल्हा परिषदेने केला आहे तर साकव व बांधकामावर देखील ४८ टक्के इतकाच खर्च जिल्हा परिषदेने केला आहे.
जिल्हा परिषदेकडे यात्रा स्थळांच्या विकासासाठी एक कोटी ३८ लाख ४८ हजार इतका निधी दिला होता त्यापैकी पिवळ २५ लाख ४५ हजार म्हणजे १९ टक्के निधीच खर्च झाला आहे. जिल्हा परिषदेकडे प्राथमिक शाळांची इमारत वर्ग खोली विशेष दुरुस्तीसाठी १२ कोटी ५० लाखपैकी केवळ ८ कोटी ५१ लाख ४८ हजार ( ६८ टक्के) इतकाच खर्च झाला आहे. तर क्रीडांगण, पटांगण, स्वतंत्र कक्षाचे बांधकाम, स्वच्छतागृह आदीसाठी वितरित चार कोटी २७ लाख ५० हजारपैकी केवळ ०१ कोटी ९६ लाख ७३ हजार म्हणजे ४६ टक्केच खर्च जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने केला आहे. सार्वजनिक आरोग्यावर १८ कोटी दोन लाख ४९ हजारपैकी १५ कोटी ८४ लाख ९० हजार म्हणजे ८८ टक्के इतकाच खर्च झाला आहे.
यामध्ये जिल्हा परिषद दवाखाने, प्राथमिक आरोग्य पथकाचे बांधकाम यासाठी जिल्हा परिषदेकडे दिलेल्या ०१ कोटी ९८ लाख ३८ हजारपैकी ५३ टक्के इतकाच खर्च झाला आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र बांधकाम, विस्तारीकरण, देखभाल दुरुस्ती यासाठी जिल्हा परिषदेकडे दिलेल्या ०३ कोटी ८० लाखापैकी ६८ टक्के इतकाच खर्च झालेला आहे.
नगर विकास अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्थान महा अभियानसाठी उपलब्ध करून दिलेल्या ४४ कोटी १७ लाखपैकी केवळ २० कोटी २६ लाख ८५ हजार म्हणजे ४६ टक्के इतकाच खर्च झाला आहे. महिला व बालविकाससाठी जिल्हा परिषदेकडे वितरित दोन कोटी छत्तीस लाख ३ हजार पैकी किंवा ४८ लाख ८१ हजार (२० टक्के इतकाच खर्च झाला आहे.
आदिवासी घटक कार्यक्रम योजनेअंतर्गत २०२३-२०२४ मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिलेल्या ०८ कोटी २० लाखापैकी ०५ कोटी ७१ लाख ८२ हजार म्हणजे ६९.७३ टक्के इतकाच खर्च जानेवारी २०२६ पर्यंत करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने देखील ०४ कोटी ०२ लाख ५५ हजारपैकी केवळ ०२ कोटी ९० लाख ४७ हजार म्हणजे ७२.१६ टक्के इतका खर्च केला आहे. यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शेळ्या, मेंढ्या वाटप्पामध्ये ४२ लाख २४ हजारपैकी ०९ लाख ७५ हजार म्हणजे २३ टक्के इतकाच खर्च केला आहे. तर दुभत्या जनावरांचा पुरवठासाठी ०२ कोटी ४० लाख ६५ हजार पैकी ०१ कोटी ६४ लाख २७ हजार (६८.२६ टक्के) तर जिल्हा आयुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयाच्या बळकटी करण्याकरता ०४ लाख ५४ हजार इतका तर आदिवासी लाभार्थ्यांना संकरित दुभत्या गाई म्हशी वितरणसाठी आदिवासी उपयोजनेतर गावांकरता ०४ लाख ०३ हजार इतका निधी दिला असला तरी यावरील एकही पैसा खर्च करण्यात आलेला नाही. या अंतर्गत ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेला आदिवासी उपयोजना क्षेत्रातील यात्रा स्थळांच्या विकासासाठी ०१कोटी ७० लाख इतका निधी दिला असला तरी यातील केवळ १८ लाख ८० हजार म्हणजे ११.६ टक्के इतकाच खर्च यंत्रणेने केला आहे. प्रकल्प अधिकारी डहाणू/जव्हार यांच्यासाठी ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा अंतर्गत ०३ कोटी ०३ लाख ८३ हजारपैकी केवळ ५९ लाख ८ हजार हणजे १७.८६ टक्के, कन्यादान योजने साठी वितरित ०४ लाख २० हजार पैकी ८० हजार इतकाच म्हणजे १९.०५ टक्के, आश्रमशाळा इमारत दुरुस्तीसाठी १० कोटी ०३ लाख ४६ हजारपैकी केवळ ०४ कोटी ते ३३ लाख ७० हजार (४३.२२टक्के), वसतीगृहगृह इमारत दुरुस्तीसाठी वितरित ०१ कोटी ५१ लाख ७५ हजारपैकी केवळ ५५ लाख ४९ हजार म्हणजे ३६.५७ टक्के, म्हणजेच मागासवर्गीय कल्याणासाठी उपलब्ध करून दिलेल्या ४१ कोटी १६ लाख ४१ पैकी २९ कोटी ७४ लाख ४३ हजार म्हणजे ७२.२६ टक्के इतकाच खर्च केला आहे.
जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा विभागासाठी नलिका विहिरी खोदण्याच्या कार्यक्रमांतर्गत वितरित केलेल्या ४९ लाख ३० हजारपैकी केवळ १६ लाख ७३ हजार (३३.९४टक्के) तर हातपंप विद्युत पण दुरुस्तीसाठी ६५ लाखापैकी केवळ ५४ लाख २ हजार (८३.११ टक्के ) व आश्रमशाळा पाणीपुरवठा स्वच्छता साठी उपलब्ध करून दिलेल्या ०१ कोटी ५० लाख पैकी केवळ ९८ लाख ९९ हजार म्हणजे ६५.९९ टक्के खर्च केला आहे. जिल्हा परिषदेला आरोग्य सेवा अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या १४ कोटी ७७ लाख ६ हजार पैकी केवळ १२ कोटी ०६ लाख १९ हजार म्हणजे ८१.६६ टक्के इतकाच खर्च केला आहे. यामध्ये आरोग्य संस्थेची स्थापना बांधकामे यामध्ये केवळ ५२. ६२ टक्के,प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापनासाठी उपलब्ध ०२ कोटी ४८ लाख १६ हजार पैकी केवळ ०१ कोटी ४५ लाख ४२ हजार म्हणजे ५८.६०टक्के इतकाच खर्च केला आहे. जिल्हा परिषद समाज कल्याण महिला व बालकल्याण समितीकडे उपलब्ध करून दिलेल्या ०६ कोटी ८० लाखापैकी केवळ ६९ लाख ८ हजार म्हणजे १०.१६ टक्के इतकाच खर्च झाला आहे.तर एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला अंगणवाडी बांधकामाकरता दिलेल्या ०५ कोटी ३० लाखापैकी केवळ ०१ कोटी ७४ लाख ४ हजार म्हणजे ३२.८४ टक्के इतकाच खर्च झाला आहे. जिल्हा परिषदेकडे कोल्हापुरी पद्धतीचे बंधार्यासाठी ०२ कोटी ४० लाखांपैकी ९३ लाख ०१ हजार म्हणजे ३८.७५ टक्के इतका खर्च झाला आहे.
नगर विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानासाठी उपलब्ध १९ कोटी ५० लाख १ हजारपैकी केवळ ०४ कोटी १८ लाख ९८ हजार म्हणजे २१.४९ टक्के इतकाच खर्च नगरपालिका जिल्हा प्रशासनाने केला आहे.
जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकामाकडे रस्ते विकासासाठी दिलेल्या २४ कोटी ८८ लाख ९१ हजार पैकी केवळ ०८ कोटी ३५ लाख ६२ हजार म्हणजे ३३.५७टक्के इतकाच खर्च झाला आहे. यामध्ये जिल्हा रस्ते राज्य व स्थानिक क्षेत्र ३०५४ मध्ये ०३ कोटी ६० लाखपैकी ४० लाख ६५ हजार (११.२९ टक्के) व ५०५४ंमध्ये ०४ कोटी ६० लाख १३ हजार पैकी ०१ कोटी २२ लाख ४१ हजार (२६.६० टक्के) जिल्हा रस्ते व राज्य स्थानिक क्षेत्र ५०५४ अंतर्गत ०४ कोटी ९५लाख ४४ हजार पैकी ०१ कोटी ९६ लाख ८८हजार ( ३९.७४) व ०३ कोटी ६० लाखपैकी ८७ लाख १७ हजार (२४.३१ टक्के) साकव बांधकाम ०२ कोटी ६३ लाख ३४ हजार पैकी केवळ ३५ लाख( १३.२९ टक्के) आश्रमशाळा जोड रस्ते सुशोभीकरण ०३ कोटीपैकी केवळ ०१ कोटी ०३ लाख ५१ हजार (३४.५०टक्के) इतकाच खर्च झाला आहे.
विद्युत विकास करिता उपलब्ध करून दिलेल्या ११ कोटी ५२ लाख ६१ हजारपैकी केवळ ०४ कोटी ६९ लाख १३ हजार म्हणजे ४०.७०टक्के इतकाच खर्च झाला आहे. यामध्ये ग्रामीण विद्युतीकरणासाठी उपलब्ध ०४ कोटी १२ लाख ०२ हजार पैकी केवळ ०१ कोटी ९१ लाख ०६ हजार म्हणजे ४६.३७टक्के, सामान्य विकासासाठी ०४ कोटी ३७ लाख ४५ हजार पैकी केवळ ०१ कोटी ५९ लाख ६७ हजार ३६.५० टक्के तर पद्धतीत सुधारणाकरता उपलब्ध करुन दिलेल्या ०३कोटी ०३ लाख १४ हजार पैकी केवळ ०१ कोटी १८ लाख ४० हजार म्हणजे ३९.०६ टक्के इतका खर्च केलेला आहे.
नाविन्यपूर्ण योजना मूल्यमापन आणि सनियंत्रण अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनासाठी उपलब्ध करून दिलेल्या ०५ कोटी ५२ लाख २४ हजार पैकी केवळ ८६ लाख म्हणजेच १५.५७ टक्के इतकाच खर्च झाला आहे.
आदिवासी घटक योजनेअंतर्गत बिगर गाभा क्षेत्रसाठीची खर्चाची टक्केवारी ३९.४८ टक्के इतकीच राहिली असून ७१ कोटी ६१ लाख ७१ हजार पैकी केवळ २८ कोटी ३७ लाख ६७ हजार इतकाच खर्च जानेवारी २०२५ अखेर झालेला आहे. तर गाभा क्षेत्रसाठी २०२३- २४ या वर्षात उपलब्ध करून दिलेल्या २२४ कोटी ५० लाख ३६ हजार पैकी १९२ कोटी ६१ लाख ५४ हजार म्हणजे ८५ % इतका खर्च जानेवारी २०२५ पर्यंत झालेला आहे.
अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत २०२३-२४ साठी डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत वितरित १५ लाखापैकी केवळ १२ लाख ५० हजार म्हणजे ८३.३३टक्के खर्च झाला आहे तर दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठासाठी उपलब्ध १७ लाख ५० हजार पैकी केवळ १६ लाख ३५ हजार म्हणजे ९३.४३टक्के खर्च झाला आहे.
दलित वस्ती अंतर्गत नागरी दलित वस्ती सुधारणा महानगरपालिकासाठी उपलब्ध करुन दिलेल्या ०३ कोटौ ७९ लाख ६१ हजार तर नगरपालिकांसाठी दिलेल्या ०३ कोटी ७८ लाख २७ हजारपैकी एकही पैसा नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी खर्च केलेला नाही.जिल्हा परिषदेकडे दिलेल्या दलित वस्त्यांची सुधारणा अंतर्गत ०३ कोटी ९१ लाख ८७ हजार पैकी ०३ कोटी ६१ लाख ८७ हजार म्हणजे ९२.३४टक्के इतका खर्च झाला आहे.माध्यमिक शाळांमध्ये शिकणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे ०१ लाख तसेच मागासवर्गीयातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कासाठी उपलब्ध करून दिलेल्या ०१ लाखांपैकी एकही पैसा दोन वर्षात खर्च झालेला नाही. याच अंतर्गत इयत्ता ०५ ते ०७ शिकणार्या मागासवर्गीय मुलींना शिष्यवृत्तीसाठी ५० हजाराची तरतूद आहे.मात्र प्रत्यक्ष एकही पैसा खर्च झालेला नाही.०८ ते १०च्या अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी ०४ लाख ५० हजारचा निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र यातील एकही पैसा खर्च झालेला नाही.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीकडे प्०५ लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे मात्र त्यातीलही एकही पैसा खर्च झालेला नाही.अनुसूचित जाती उपयोजनासाठी २३-२४ मध्ये १४ कोटीचा निधी वितरित केला होता त्यापैकी जानेवारी २०२६ पर्यंत प्०५ कोटी ९३ लाख ४७ हजार म्हणजेच ४२.३९ टक्के इतकाच खर्च झाला आहे.