नवयुग पालघर, खास बातमी :
पालघर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
मुंबई : पालघर जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती अर्थात आदिवासीसाठी आरक्षित घोषित झाले आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी
१२ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली.यात पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचेही आरक्षण जाहीर झाले आहे. विविध प्रवर्गांनुसार ठरविण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे.
या आरक्षण घोषणेमुळे पालघर जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय गणितात मोठे बदल होणार आहेत. पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती करिता आरक्षित असणार हे स्पष्ट होते. मात्र अनुसूचित जमाती महिला असे विशिष्ट आरक्षण न झाल्याने आता दोन्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षात मोठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. या परिणामी अनुसूचित जमाती इच्छूक महिलांची धाकधूक वाढणार आहे.