विराज इंटरनॅशनल स्कूलचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Date: 2025-09-16
news-banner
विराज इंटरनॅशनल स्कूलचा राष्ट्रीय  स्तरावर गौरव

         विराज इंटरनॅशनल स्कूलने राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे. प्रतिष्ठित आय.पी.एन. इन्स्पायर अवॉड्‌र्स २०२५ या राष्ट्रीय स्पर्धेत शाळेतील तीन शिक्षकांनी टॉप ७ फायनलिस्टमध्ये स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
    या स्पर्धेत  योगेश मिश्रा यांनी प्रथम उपविजेतेपद, तर  पौर्णिमा कुंभार यांनी चौथा क्रमांक आणि  रश्मी ठाकूर यांनी पाचवा क्रमांक मिळवून शाळेला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून दिला आहे. देशभरातील १५०० हून अधिक शिक्षक आणि ५०० पेक्षा जास्त शाळांमधून झालेल्या निवड प्रक्रियेनंतर हे यश संपादन झाले.
          विराज इंटरनॅशनल स्कूलच्या या तिघा शिक्षकांच्या निष्ठा, नवोन्मेषी दृष्टीकोन आणि अथक परिश्रमामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. या कामगिरीमुळे शाळेचा राष्ट्रीय स्तरावरील लौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे.
शिक्षकांच्या या कर्तृत्वाचा विद्याथ्र्यांना, सहकार्‍यांना आणि संपूर्ण विराज परिवाराला प्रेरणादायी ठरेल, असे मत शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केले.

Leave Your Comments