नवयुग पालघर ३१.०८/०७.०९
२०१९ ते २०२४ विधानसभा निवडणूक दरम्यान मतदार संख्येत ३,४०,३९८
तर २०१९ ते ३ सप्टेंबर २०२५ दरम्यान ४,४७,६८२ ने वाढ
वोट चोरी अर्थात मत चोरीचा मुद्दा देशात सर्वत्र गाजत आहे. या पाश्र्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील २०१९ ते ०३ सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या मतदार वाढीचा आढावा नवयुग पालघरच्या वाचकांसाठी मुद्दाम समोर ठेवत आहोत.
२०१९ विधानसभा ( जिल्हा १९५१६६८) ते २०२४ विधानसभा (जिल्हा २२९२०६६)या दरम्यान जिल्ह्यात अर्थात पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ४० हजार ३९८ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे .तर २०१९ ते ३ सप्टेंबर २०२५(जिल्हा २३९९३५०) दरम्यान ही वाढ ४,४७. ६८२ इतकी आहे. विधानसभा निहाय २०१९ (डहाणू २८०७९९, विक्रमगड २९९५२९, पालघर २७७७५८, बोईसर ३५८३६२, नालासोपारा ५२४०४८, वसई ३२२८४४) ते २०२४ विधानसभा(डहाणू ३०१२३९, विक्रमगड ३१७७४१, पालघर २९८५७९, बोईसर ४११३२९, नालासोपारा ६०८५२६, वसई ३५४६५२) मतदारसंघातील वाढ अनुक्रमे
डहाणू २०४४०, विक्रमगड १८२१२, पालघर २०८२१,बोईसर ५२९६७,नालासोपारा ८४४७८,वसई ३१८०८ इतकी आहे तर २०१९ ते ३ सप्टेंबर २०२५(डहाणू ३१०५९५,विक्रमगड ३२३६२७,पालघर ३०५२३२,बोईसर ४३८१३७,नालासोपारा ६५८०८१,वसई ३६३६७८) पर्यंतची वाढ विधानसभा मतदारसंघनिहाय डहाणू ३८५२६, विक्रमगड ५७१७८, पालघर ३१२३८,बोईसर १२२७३७,
नालासोपारा १३८९९९,वसई ५९००४ इतकी आहे २०२४ विधानसभा (जिल्हा एकूण २२९२०६६)ते ३ सप्टेंबर २०२५( पर्यंतची जिल्हा एकूण अर्थात पालघर लोकसभा मतदारसंघातील ( २३९९३५०) मतदारांची वाढ १०७,२८४ इतकी आहे तर विधानसभा निहाय मतदारसंघाप्रमाणे ही वाढ डहाण ९३५६ू, विक्रमगड ५८८६, पालघर ६६५३, बोईसर २६८०८, नालासोपारा ४९५५५ , वसई ९०२६इतकी आहे.
सोबतच्या तक्त्यात २०१९ ते २०२२ अशा विविध क्रमवारी प्रमाणे ०३ सप्टेंबर २०२५ पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर झालेली विधानसभानिहाय मतदार वाढ तसेच पालघर लोकसभा अर्थात पालघर जिल्ह्यातील मतदार संख्या वाढ दर्शविलेली आहे. या माहितीनुसार २०१९ ते २०२२ या पहिल्या टप्प्यात विधानसभा मतदारसंघ मतदार वाढ अनुक्रमे डहाणू, ६४१ विक्रमगड २२४१०, पालघर २०२६ , बोईसर, ८११३२ नालासोपारा १३७७३, वसई १०९५७ इतकी आहे.