जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने ३२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ३३६ पंचायत समित्यांचा (पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ८ पंचायत समित्यांचा) सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या कार्यक्रमानुसार, मतदार यादीचा प्रारंभ धारणाचा दिनांक १ जुलै २०२५ असा निश्चित करण्यात आला आहे.म्हणजेच ०१ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध मतदार यादीतील मतदार ग्राह्य धरले जातील) त्यानंतर ०८ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या विद्यमान मतदार यादीनुसार जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हा परिषद विभाग तथा गट व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या गणनिहाय मतदार यादी हस्तलिखित स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
या प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्यासंदर्भात हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १४ ऑक्टोबर हा अंतिम दिनांक राहणार असून, अंतिम मतदार यादी छापील स्वरूपात २७ ऑक्टोबर रोजी अधिसूचित करण्यात येईल. याच दिवशी अंतिम मतदार यादी माहितीस्तव ठेवण्यात येणार असून, संबंधित याद्या प्रसिद्ध देखील केल्या जातील.
तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार यादीदेखील २७ ऑक्टोबर रोजीच प्रकाशित होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.