डहाणू रेल्वे स्टेशनजवळ अमृतसर एक्सप्रेसची धक्कादायक घटना – दोन डबे गाडीतून विलग

Date: 2025-09-28
news-banner
डहाणू रेल्वे स्टेशनजवळ अमृतसर एक्सप्रेसची धक्कादायक घटना – दोन डबे गाडीतून विलग

डहाणू : पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाजवळ रविवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी अमृतसर एक्सप्रेसचे दोन डबे गाडीतून अचानक वेगळे झाल्याची घटना घडली. मुंबईहून अमृतसरकडे जात असलेल्या या गाडीतील डबे सुटल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने गाडी थांबवून तांत्रिक पथकाच्या मदतीने डबे पुन्हा जोडण्याचे काम सुरू केले. या दरम्यान डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक जवळपास ४० मिनिटे विस्कळीत झाली, ज्याचा परिणाम लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांवर झाला.

 या प्रकारात कोणतीही जीवितहानी किंवा अपघात झाला नाही. रेल्वे प्रशासनाने घटनेचा तपास सुरू केला आहे.

Leave Your Comments