🚨 धामणी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग — सूर्य नदीची पातळी अजूनही इशारा पातळीखाली 🌧️
2८ सप्टेंबर २०२५, सकाळी ७ वाजता — धामणी धरण पूर्णपणे (१००%) भरले असून पाण्याची पातळी ११८.६० मीटरवर पोहोचली आहे. पहाटे २ वाजता सर्व ५ गेट प्रत्येकी २५ सें.मी.ने उघडण्यात आल्यामुळे एकूण ५० सें.मी. उघडण्यामधून १०,६२९ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याशिवाय विज निर्मिती केंद्रातून आणखी ६५० क्युसेक पाणी सोडले जात आहे.
कवडास येथे पाण्याची पातळी ६५.०५ मीटर नोंदवली गेली आहे. आज सकाळपर्यंत परिसरात २६९ मिमी मुसळधार पाऊस झाला असून, धरणातून सोडलेल्या पाण्यासोबत मुक्त जलग्रहण क्षेत्रातून सुमारे ३०,००० क्युसेक अतिरिक्त पाणी मिळत आहे. त्यामुळे कवडास येथे एकूण प्रवाहाचा प्रमाण ४७,००८ क्युसेक इतका झाला आहे.
दरम्यान, सूर्य नदीची पातळी अद्याप इशारा पातळीखालीच आहे, परंतु धरणातून वाढलेला विसर्ग आणि परिसरातील जोरदार पावसामुळे नदीत पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे अशा सूचना सूर्या प्रकल्प प्रशासनाने दिल्या आहेत