नवयुग पालघर
https://youtu.be/-t_cYn719ek?si=UhUCjM897cMAAXYh
****वसईत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अभूतपूर्व जनआक्रोश; वाघोली–निर्मळ लाँग मार्चला हजारोंची उपस्थिती****
वसई | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वसईत रविवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने संताप व्यक्त केला. महिलांच्या पुढाकारातून वाघोली ते निर्मळ दरम्यान काढण्यात आलेल्या लाँग मार्चला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. आयोजकांच्या माहितीनुसार सुमारे अडीच ते तीन हजार नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चामध्ये महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मार्चदरम्यान सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चाला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे वाघोली ते निर्मळ मार्गावर सहभागींची सुमारे दीड किलोमीटर लांबीची रांग लागली होती.
गर्दी वाढल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना काही काळ संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावे लागले.
आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील घटनेचा निषेध नोंदवत, विद्यार्थ्यांवरील लाठीमार हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याची भावना व्यक्त केली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा या प्रकरणाचा शेवट नसून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी ठोस सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत अनेक महिलांनी व्यक्त केले.
याशिवाय, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर बलप्रयोग करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि या प्रकरणामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली.
संपूर्ण बातमी पाहा.
🌐 Website: navyugpalghar.com
📲 Follow Us for latest Palghar & Vasai-Virar News.
#Vasai #LongMarch #NEET #StudentProtest #JantarMantar #Palghar #VasaiVirar #NavyugPalghar #MaharashtraNews #BreakingNews
Instagram Caption