डहाणू येथे अतिवृष्टी नुकसानीचा आढावा — तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना पंचायत समिती सभागृहात आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Date: 2025-09-30
news-banner

https://youtu.be/czfEXjbFmrA?si=kRYrZvjEbxiySRLr
🌧️ डहाणू येथे अतिवृष्टी नुकसानीचा आढावा — तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना
पंचायत समिती सभागृहात आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

डहाणू | प्रतिनिधी
डहाणू तालुक्यात अलीकडील अतिवृष्टीमुळे विविध भागांत झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी पंचायत समिती जिव्या म्हसे सभागृहात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस आमदार विनोद निकोले अध्यक्षस्थानी होते. प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी तसेच स्थानिक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान अतिवृष्टीमुळे पायाभूत सुविधा, शेती व घरांचे झालेल्या नुकसानीवर चर्चा करून तातडीच्या उपाययोजनांसाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

✓ अतिपावसामुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या.
✓ भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कृषी विभागाला शेतांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आल्या.
✓ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी डहाणू तहसीलदारांना तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या बैठकीस तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, तालुका कृषी अधिकारी नरगुडलवार, तालुका अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नुकसानभरपाई व पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यावर एकमताने भर देण्यात आला.

Leave Your Comments