🌹मुख्यमंत्री सहाय्यता पूरग्रस्त निधीसाठी डहाणूतील निवृत्त कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात🌹

Date: 2025-11-03
news-banner
🌹मुख्यमंत्री सहाय्यता पूरग्रस्त निधीसाठी डहाणूतील निवृत्त कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात🌹

पालघर, ३ नोव्हेंबर – सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत डहाणू तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघाने मुख्यमंत्री सहाय्यता पूरग्रस्त निधीसाठी रु. १,५१,००० (अक्षरी एक लाख एक्कावन हजार) इतकी रक्कम जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त केली. हा धनादेश पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे व उपाध्यक्ष हेमंत धानमेहर यांनी आज (दि. ३ नोव्हेंबर) प्रदान केला.

या प्रसंगी संस्थेचे सरचिटणीस शांताराम जाधव, हेमंत राऊत, मिता सावे, विवेक नवघरे, ईश्वर काकड, योगराज शिरसाठ आणि भिवा घोडा उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी संघाच्या या सामाजिक योगदानाचे कौतुक करत “डहाणू तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे कार्य आदर्शवत असून समाजातील इतर संस्थांसाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार काढले.

यापूर्वीही या संघाने कोरोना काळात, कोकणातील चिपळूण येथील पूरस्थितीत तसेच सातारा-सांगली पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भरीव मदत केली आहे. सामाजिक बांधिलकीचा हा परंपरागत वारसा संघ सातत्याने जपत आहे.

दरम्यान, चालू वर्षी डहाणू ज्येष्ठ नागरिक संस्थेनेही पूरग्रस्त निधीसाठी रु. ५१,००० (अक्षरी एक्कावन्न हजार) इतकी रक्कम महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाकडे (FESCOM) पाठवून सामाजिक जाणिवेचा उत्तम आदर्श निर्माण केला आहे.

Leave Your Comments