सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंट हायस्कूल होळी येथे शिक्षक राजेंद्रकुमार ढगे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
https://youtu.be/1am8pNxDUpI?si=ohrAYI7HlrvjGg6Z
वसई (प्रतिनिधी):
सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंट हायस्कूल, होळी येथील ज्येष्ठ व अनुभवी इंग्रजी विषयाचे शिक्षक राजेंद्रकुमार रामदास ढगे यांचा भव्य सेवापूर्ती सत्कार सोहळा शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेत तब्बल २८ वर्षे, ४ महिने आणि १८ दिवस निष्ठेने सेवा बजावलेल्या ढगे यांनी, विद्यार्थ्यांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे.
१९९७ सालच्या १३ जून रोजी त्यांनी या शाळेत शिक्षक म्हणून कार्यास सुरुवात केली होती. इंग्रजी विषयाबरोबरच विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. २००० साली राज्यस्तरीय व विभागीय स्तरावर इंग्रजी विषय तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर २९ बॅचेस यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्या असून, असंख्य विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
सत्कार समारंभाला वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी, माजी परिवहन समिती अध्यक्ष प्रितेश पाटील, न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका शोभना वाज, ग्रामविकास अधिकारी रमेश उंदरे, माजी विस्तार अधिकारी चव्हाण, शालेय समिती सदस्य स्टॅनि अलमेडा , ग्रेगी मेलो , माजी कर्मचारी विल्सन गोम्स, लायन्स क्लब ऑफ युनिक वसईचे अध्यक्ष निलेश घरत, सचिव दीपक बडगुजर, खजिनदार काळे, तसेच इव्हेट कुटिनो उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या व्यवस्थापिका सिस्टर लुसी यांनी भूषविले तर शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर स्मिता आगासकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अलका रॉड्रिक्स यांनी केले.
विद्यार्थिनी कुमारी धृती घरत (इ. ९ वी) हिने विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले, तर शिक्षकांच्या वतीने मीना रॉड्रिक्स यांनी भावना व्यक्त केल्या. माजी विस्तार अधिकारी चव्हाण, सेंट झेवियर माणिकपूरचे मुख्याध्यापक मायकल घोणसालवीस, तसेच अलमेडा यांनीही आपल्या आठवणींना उजाळा दिला.
ढगे यांची कन्या सुप्रिया ऋषिकेश सांबरे हिने वडिलांविषयी हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सत्कारमूर्ती राजेंद्रकुमार ढगे यांनी सर्व मान्यवर, सहकारी व विद्यार्थ्यांचे आभार मानत आपल्या सेवाकालातील आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक — अविनाश , शिक्षिका चेतना , डोनेटा लोपिस, जॉर्डन अलमेडा, भानुप्रताप सिंह, प्राथमिक विभागातील संगीता डाबरे, लोरेटा मॅडम, तसेच ढगे कुटुंबीय — पत्नी छाया ढगे, मुलगा
प्रथमेश आदी उपस्थित होते.
तसेच ठाणे-पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पतपेढीचे कार्यवाह व संघटना सचिव नामदेव पाटील, न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक रखमाढोणे, माजी विद्यार्थी सुनील मोसेकर, निलेश घरत, जॉर्डन डिमेलो उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी वसई विकासचे अजय खोकाणे, संतोष वाळवईकर, प्रशांत घुमरे यांनी शुभेच्छा संदेश पाठवले. ढगे सरांचे अनेक विद्यार्थी परदेशात असून, त्यांनी कॅनडा, कुवेत आणि इंग्लंड येथूनही शुभेच्छा संदेश पाठवले.
कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, स्वागत गीत, नृत्य सादरीकरण करून वातावरण रंगवले. अखेरीस व्यवस्थापिका, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांनी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
आभार प्रदर्शन दिलीप चव्हाण यांनी केले. स्नेहभोजनाने या भावनिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली.