नवयुग पालघर
**पालघर जिल्ह्यात ३ नवीन
अप्पर तहसीलदार कार्यालये**
जिल्ह्यात महसूल प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी डहाणू, पालघर आणि वसई येथे तीन नवीन अप्पर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्याचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला आहे. या नव्या रचनेनुसार डहाणू तालुक्यांतर्गत कासा, पालघर तालुक्यांतर्गत बोईसर, तर वसई कार्यालयांतर्गत विरार येथे कार्यालय राहणार आहे. यात कासा अंतर्गत कासा, चारोटी व सायवन ही तीन महसूल मंडळे ; बोईसर अंतर्गत बोईसर, तारापूर, मनोर व लालोंडे ही चार महसूल मंडळे तर विरार अंतर्गत विरार, मांडवी, आगाशी व बोळोंज ही चार महसूल मंडळे व या प्रत्येक महसूल मंडळांतर्गत तलाठी सजा व गावे , प्रस्तावित आहेत. विरार येथील कार्यालय निळेमोरे-नालासोपारा येथे तर उर्वरित कासा व बोईसर येथेच प्रस्तावित आहेत.
या प्रस्तावावर नागरिक व संबंधित घटकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या असून त्या नोंदविण्याची अंतिम तारीख ०७ जुलै २०२६ आहे.
निर्णयाचे सर्वसाधारण स्वागत होत असले तरी नवीन बोईसर अप्पर तहसीलदार कार्यालयात मनोरचा समावेश करण्यात आल्याने नागरिकांना गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त करत काहींनी यावर हरकत नोंदविल्याचे समजते .