रुबल अग्रवाल यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

Date: 2026-04-07
news-banner
नवयुग पालघर 

**रुबल अग्रवाल यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती**

           कोकण विभागाच्या प्रशासनाला नवे नेतृत्व मिळाले असून, सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी ३० मार्च २०२६ रोजी प्रभारी आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
          २००८ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या अग्रवाल यांनी सोलापूर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली. त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अहमदनगर व जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द राहिली.
            शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी शताब्दी महोत्सवाचे नियोजन केले. तसेच पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असताना कोविड-१९ संकटाचे प्रभावी व्यवस्थापन केल्याबद्दल त्यांची राज्य व राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली होती.
              कोकण विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागातील कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave Your Comments