रोशन जैन अटकेत; शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली २.३९ कोटींची फसवणूक पालघर जिल्हा पोलीस दलाची मोठी कारवाई पालघर :

Date: 2026-01-08
news-banner
रोशन जैन अटकेत; शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली २.३९ कोटींची फसवणूक
पालघर जिल्हा पोलीस दलाची मोठी कारवाई
पालघर :

https://www.instagram.com/reel/DTPtSxaDGvf/?igsh=MXFsOHR5b2RwbGZxcQ==

             शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या RICH 2 MONEY PVT. LTD. या बोईसर येथील कंपनीचा संचालक रोशन चंदनलाल जैन (वय ३६, रा. बोईसर) याला पालघर जिल्हा पोलीस दलाने अटक केली आहे. या प्रकरणात एकूण २ कोटी ३९ लाख ४६ हजार ६९८ रुपये इतक्या रकमेची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
            याप्रकरणी तक्रारदार दिपक बाबू वरक (वय ४२, व्यवसाय – नोकरी, रा. विरार पूर्व) व इतर १३ गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रारीनुसार, २०२२ पासून RICH 2 MONEY PVT. LTD. या कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक परतावा मिळेल, असे आश्वासन, प्रलोभन व आमिष दाखवण्यात आले होते. मात्र गुंतवणूक स्वीकारल्यानंतर गुंतवणूकदारांना कोणताही परतावा देण्यात आलेला नसल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थेमधील) हितरक्षण अधिनियम, १९९९ मधील कलम ३ व ४ अन्वये गुन्हा ( रजिस्टर क्रमांक १०५/२०२६ )
 नोंदविण्यात आला आहे.
            या गुन्ह्यात आरोपी रोशन चंदनलाल जैन यांना ०५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९.४८ वाजता अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिता अथणे, आर्थिक गुन्हे शाखा, पालघर या करीत आहेत.
          फसवणुकीत अन्य कोणी सहभागी आहे का, तसेच गुंतवणूकदारांची रक्कम कुठे व कशा पद्धतीने वळविण्यात आली आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.
            पालघर जिल्हा पोलिसांनी जादा परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या गुंतवणूक योजनांपासून सावध राहावे व संशयास्पद आर्थिक व्यवहारांची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी असे नागरिकांना आवाहन केले आहे.

Leave Your Comments