उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी सुवर्णसंधी; पालघरमध्ये मोफत क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिर

Date: 2026-04-10
news-banner
**उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी सुवर्णसंधी; पालघरमध्ये मोफत क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिर**

             उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करत बालकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने “उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास” प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २० एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान होणारे हे शिबिर पूर्णपणे विनामूल्य असून ८ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी ठरणार आहे.

जिल्हा क्रीडा संकुल, पालघर येथे आयोजित या शिबिरामध्ये देशी-विदेशी मैदानी खेळांसह बॅडमिंटन, सॉफ्टबॉल, कबड्डी, खो-खो आदी खेळांचे तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच व्यक्तिमत्व विकासावरही विशेष भर दिला जाणार असून खेळाडूंना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळावे यासाठी अनुभवी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या शिबिरासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी १५ ते २० एप्रिल २०२६ दरम्यान नावनोंदणी करावी. नोंदणी करताना २ छायाचित्रे, आधारकार्ड, रहिवासी दाखला व बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी गिरीश इरनक (मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी) – ९२८४२०९६३७, अमृत घाडगे – ९८७००४८६४९, मयूर खोल्लम – ९८३४०९००६१, प्रितीश पाटील – ८२०८८९८६५० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले आहे.

Leave Your Comments