पालघरमध्ये ‘सम्पर्क टॉप टीचर अवॉर्ड्स’: ६० शिक्षक व शाळांचा सन्मान — ८०० शाळांमध्ये उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी

Date: 2025-12-10
news-banner
https://youtu.be/KKsFfuuMEjw?si=jj5FFGSOrYh4XYUQ

पालघरमध्ये ‘सम्पर्क टॉप टीचर अवॉर्ड्स’: ६० शिक्षक व शाळांचा सन्मान — ८०० शाळांमध्ये उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी

पालघर, दि. १० डिसेंबर : सम्पर्क फाउंडेशनच्या FLN कार्यक्रमांतर्गत बहुआयामी शिक्षणसाधनांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या Foundational Literacy and Numeracy (FLN) कौशल्यात उल्लेखनीय सुधारणा घडवून आणणाऱ्या पालघर जिल्ह्यातील ६० शिक्षक आणि शाळांचा ‘सम्पर्क टॉप टीचर अवॉर्ड्स – २०२४-२५ सोहळ्यात सन्मान करण्यात आला. सध्या सम्पर्क फाउंडेशनचे विविध उपक्रम जिल्ह्यातील सुमारे ८०० शाळांमध्ये यशस्वीपणे राबवले जात असून, शाळांना ६०५ संपर्क टीव्ही ( Sampark TV ) युनिट्स आणि १.०३० शैक्षणिक उपकरणे (डिव्हाइसेस) प्रदान केल्यामुळे अध्यापनाची परिणामकारकता वाढीस लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘सम्पर्क टॉप टीचर अवॉर्ड्स’मध्ये निवड झालेल्या शिक्षकांनी संपर्क टीव्ही आधारित मल्टिमीडिया साधनांच्या वापरातून विद्यार्थ्यांच्या मूलभूत भाषिक आणि गणितीय कौशल्यात लक्षणीय प्रगती साधली आहे. जिल्ह्यात मिळालेल्या प्रतिसादामुळे हा उपक्रम ग्रामीण व दूरवरच्या शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास हातभार लावत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे म्हणाले, “नाविन्यपूर्ण दृष्टी आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ही शिक्षण व्यवस्थेच्या उन्नतीची गुरुकिल्ली आहे. सम्पर्क उपक्रमांमुळे जिल्ह्यात सकारात्मक बदल घडत आहेत.”

सम्पर्क फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष विनीत नायर यांनी संदेशातून सांगितले की, “आनंददायी, सहभागात्मक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचवणे हे संस्थेचे ध्येय आहे. ‘टॉप टीचर अवॉर्ड्स’ हा उपक्रम शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा योग्य सन्मान करतो.”

राष्ट्रीय स्तरावर या उपक्रमांतर्गत ४.३४४ शिक्षक, १,८७८ शाळा आणि ८८१ ब्लॉक्स सन्मानित झाले आहेत. देशातील ८ राज्यांमध्ये राबवला जाणारा हा उपक्रम १.८ कोटी विद्यार्थी, २ लाख शिक्षक आणि १ लाखाहून अधिक शाळांना लाभ देत आहे.
 

हा गौरव सोहळा जिल्हा परिषद पालघर येथील जननायक बिरसा मुंडा सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे होते. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील, DIET प्राचार्य संभाजी भोजने तसेच सम्पर्क फाउंडेशनच्या राज्यप्रमुख मयुरी कुलकर्णी यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन महेश होले (झोनल मॅनेजर) आणि अभिजित लोहकरे (प्रोग्राम कोऑर्डिनेटर, पालघर) यांनी केले. सूत्रसंचालन अजित दळवी यांनी केले.

कार्यक्रमासाठी DIET पालघरचे तानाजी डावरे, विक्रमगड गटशिक्षणाधिकारी चेतन वाडीले, पालघर विस्तार अधिकारी निलम पास्ते, तलासरी विस्तार अधिकारी नितीन राऊत, तसेच केंद्रप्रमुख हरीश वैद्य आणि किरण रोडे यांनी सहकार्य केले.

मान्यवरांनी पालघरमधील शिक्षक, शाळा आणि अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त केले.

Leave Your Comments