https://youtu.be/j1saMUwMK3k?si=D-sgAsST358XiF0X
जिल्हा नियोजन समितीच्या
४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत २०२५-२६ वर्षातील खर्चाची माहिती देण्यात आली..या माहिती नुसार गेल्या दहा महिन्यात फारच कमी निधी खर्च झाला असून अखर्चित निधी ५०० कोटीच्या वर आहे.. यात अनेक बाबींवर दहा महिन्यात नवा पैसाही खर्च झाला नाही.. नवयुग पालघरने घेतलेला हा धांडोळा
शून्य..शून्य..शून्य..दोन महिन्यात शुन्यावरुन १०० टक्क्यांवर मजल मारणार ?
भाग १: जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम
आदिवासी गट कार्यक्रम योजनेअंतर्गत जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी फलोत्पादनासाठी अर्थसंकल्पीय तरतूद ३० लाखपैकी,पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम अर्थसंकल्पीय तरतूद ०३कोटी/दायित्व निधी ०३कोटी ४५ लाख पैकी, पशुसंवर्धन जिल्हा परिषद अर्थसंकल्पीय तरतूद ४ कोटी ४१ लाख व दायित्व निधी ४४ लाख ८६ हजारपैकी, जिल्हा तालुका सर्व चिकित्सालय व कृत्रिम रेतन केंद्राचे बांधकाम अर्थसंकल्पीय तरतूद २ कोटी ८२ लाख ७२ हजार व दायित्व निधी ०२ कोटी ७२ लाख पैकी, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अंतर्गत मत्स्य विकाससाठी अर्थसंकल्पीय तरतूद पाच लाख दहा हजारपैकी, मध्यवर्ती रोप मळे व बी-बियाणे तयार करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद ७० लाखपैकी, आदिवासी लाभार्थ्यांना स्वयंपाक गॅस व सौर कुकर वाटप अर्थसंकल्पीय तरतूद १० लाखंपैकी, औद्योगिक व व्यापारी उपयोगासाठी लागणार्या वन झाडाच्या जातीच्या लागवडीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद ५३ लाख १५ हजारपैकी,सर्वसाधारण उपयोगाची झाडे लावणे अर्थसंकल्पीय तरतूद ५७ लाख १५ हजारपैकी, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील यात्रास्थळांचा विकास अर्थसंकल्पीय तरतूद ०२ कोटी ७० लाखपैकी, आश्रमशाळा क्रीडा स्पर्धा अर्थसंकल्पीय तरतूद ६६ लाखपैकी, ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा उपयोजना क्षेत्राबाहेरील अर्थसंकल्पीय तरतूद ४ कोटी ७७ लाख व दायित्व निधी २ कोटी ८१ हजार पैकी सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अर्थसंकल्प २६ कोटी ५३ लाखपैकी, कन्यादान योजना अर्थसंकल्पीय तरतूद ४५ लाखपैकी,वसतीगृह इमारत दुरुस्ती अर्थसंकल्पीय तरतूद ०१ कोटी पैकी, सांस्कृतिक भवन बांधकाम अर्थसंकल्पीय तरतूद ०१कोटी २५ लाखपैकी, माध्यमिक शालांत परीक्षा पूर्व शिक्षणाच्या सुविधांमध्ये वाढ अर्थसंकल्पीय तरतूद ०१ कोटी ७५ लाख पैकी, ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करणे अर्थसंकल्पीय तरतूद ०१ कोटी ४६ लाखपैकी, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयाला औषध खरेदी अर्थसंकल्पीय तरतूद ०८ कोटी १६ लाखपैकी, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम ४३ लाखपैकी,दृष्टी दान योजना ८० लाख अर्थसंकल्पीय तर ग्रामीण रुग्णालय बांधकाम अर्थसंकल्पीय तरतूद ०१ कोटी ९७ लाख व दायित्व निधी ०१ कोटी ९७ लाखपैकी, महिला बाल विकास अर्थसंकल्पीय तरतूद २ कोटी ७० लाखपैकी, अंगणवाडी बांधकाम अर्थसंकल्पीय तरतूद ०९ कोटी व दायित्व निधी ०१ कोटी ५२ लाखपैकी, जिल्हा रस्ते राज्य व स्थानिक क्षेत्र अर्थसंकल्पीय तरतूद ०३ कोटी ६० लाख व दायित्व निधी ३२ लाख पैकी तसेच अर्थसंकल्पीय तरतूद ०४कोटी ५० लाख व दायित्व निधी ०१ कोटी ४५ लाख पैकी, जिल्हा रस्ते राज्य व स्थानिक क्षेत्र ५० ५४ अर्थसंकल्पीय तरतूद ४ कोटी ८५ लाख व दायित्व निधी ४७ लाख ५९ हजारपैकी तसेच अर्थसंकल्पीय तरतूद ०३कोटी ६० लाख पैकी, साकव बांधकाम अर्थसंकल्पीय तरतूद ०२ कोटी ९० लाख व दायित्व निधी २३ लाख ३४ हजारपैकी, शासकीय निवासस्थान बांधणे अर्थसंकल्पीय तरतूद ०२ कोटी ४०लाख व दायित्व निधी ४ कोटी ९० लाख ७८ हजार पैकी, उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम अर्थसंकल्पीय तरतूद १० लाख ८० हजार व तीन लाख ६०हजारपैकी,सुशिक्षित बेरोजगारांना बीज भांडवल अर्थसंकल्पीय तरतूद ०१ लाखपैकी, ग्रामीण विद्युतीकरण आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर अर्थसंकल्पीय तरतूद ०१ कोटी ५९ लाखपैकी, विद्युत सामान्य विकास अर्थसंकल्पीय तरतूद ०३कोटी ४५ लाख व दायित्व निधी ०१ कोटी ६६ लाख पैकी, पद्धतीत सुधारणा अर्थसंकल्पीय तरतूद २ कोटी ८० लाख व दायित्व निधी ०२ कोटी ८७ लाखपैकी, नाविन्यपूर्ण योजना अर्थसंकल्पीय तरतूद ०६ कोटी ८८ लाख ७१ हजार व दायित्व निधी ०२ कोटी एक लाख ३८ हजारपैकी,नाविन्यपूर्ण योजना उपयोजना क्षेत्रा बाहेर अर्थसंकल्पीय तरतूद १३ लाख ४२ हजारपैकी डिसेंबर २०२५ अखेर एकही पैसा खर्च झालेला नाही.
याउपर, वनविभाग अंतर्गत मध्यवर्ती रोप मळ्यांची स्थापना अर्थसंकल्पीय तरतूद ०१ कोटी ०५ लाख व दायित्व निधी ३२ लाख पैकी, संयुक्त वन व्यवस्थापन अर्थसंकल्पीय तरतूद ५५ लाख १५ हजारपैकी केवळ ०५टक्के, अग्नीपासून वाहनांचे संरक्षण अर्थसंकल्पीय तरतूद ३० हजार, दारित्व निधी ४० हजारपैकी केवळ ०६ टक्के, ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा अर्थसंकल्पीय तरतूद १३ कोटी ४२ लाख व दायित्व निधी ९ कोटी ४९ लाखपैकी केवळ ०१ टक्का, क्रीडांगणाचा विकास अर्थसंकल्पीय तरतूद ०२ कोटी व दायित्व निधी ७२ लाख ५६ हजार पैकी केवळ ०१ टक्का, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपकरणाच्या त्रुटी भरून काढणे अर्थसंकल्पीय तरतुद ०१ कोटीपैकी केवळ ०६ टक्के, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी कार्यशाळा इमारत बांधणे अर्थसंकल्पीय तरतूद ०७ कोटी ७० लाख व दारित्व निधी ०१ कोटी ७८ लाख ९१ हजारपैकी केवळ ०६ टक्के, आश्रमशाळा पाणीपुरवठा व स्वच्छता अर्थसंकल्पीय तरतूद ०७ कोटी ९० लाख व दायित्व निधी ०३ कोटी ८२ लाखपैकी केवळ ०३ टक्के, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ० ते १०० हेक्टर अर्थसंकल्पीय तरतूद ०८ कोटी ९५ लाख व दायित्व निधी ०१ कोटी ०३लाख पैकी केवळ ०३ टक्के, आश्रमशाळा जोड रस्ते व सुशोभीकरण अर्थसंकल्पीय तरतूद ४ कोटी ४२ लाख व दायित्व निधी ०२ कोटी ३४ लाखपैकी केवळ ९ टक्के इतकाच खर्च डिसेंबर २०२५ अखेर झालेला आहे.अन्य बाबींवरील खर्चही खूपच कमी झाल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते.
भाग २ : वार्षिक योजना सर्वसाधारण :
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनाअंतर्गत मृदसंधारण साठी नियतव्यय ०४ कोटी ९० लाख व दायित्व निधी ०३ कोटी ५४ लाख पैकी तसेच पशुसंवर्धन नियतव्यय ०३ कोटी ४० लाख दायित्वनिधी ४ लाख ३६ हजार पैकी, मत्स्यव्यवसाय नियतव्यय ५ कोटी ९० लाख दायित्व निधी ०१ कोटी ४८ लाखपैकी, गट ०२ ग्रामविकास नियतव्यय २० कोटी ,दायित्व निधी ०३ कोटी २५ लाखपैकी, विद्युत वितरण कंपनी अनुदान ०३ कोटी ५० लाख दायित्व निधी ०१ कोटी ४२ लाखपैकी, इतर जिल्हा रस्त्यांचा विकास ०४ कोटी ५० लाख नियतव्यय व दायित्व निधी ०१ कोटी ८२ लाख पैकी, ग्रामीण रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण नियतव्यय ०५ कोटी ५७ लाख व दायित्व निधी ०२ कोटी ३७ लाखपैकी,इको टुरिझम दोन नियतव्यय २ कोटी ५० लाख व दायित्व निधी १८ लाख १८ हजारपैकी, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, इंटरनेट वाय-फाय सुविधा निर्माण करणे नियतव्यय ०४ कोटीपैकी, जिल्हा ग्रंथालय स्थापना, मध्यवर्ती जिल्हा तालुका ग्रंथालय सहाय्य, ग्रामपंचायत इतर सार्वजनिक ग्रंथालयांना सहाय्य ५० लाख पैकी, सार्वजनिक आरोग्य अंतर्गत हॉस्पिटलची यंत्रसामुग्री व साधनसामग्री खरेदी करणे ०१कोटी ५० लाखपैकी, प्राथमिक आरोग्य केंद्र/ उपकेंद्राचे बांधकाम विस्तारीकरण नियतव्यय ०४कोटी व दायित्व निधी ०२ कोटी ५९ लाखपैकी, नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा वसई मनपा नियतव्यय २५ कोटी व दायित्व निधी ६ कोटी ७७ लाखपैकी, नगरपरिषदा नगरपालिकांच्या अग्निशामन व आपत्कालीन सेवांचे बळकटीकरण नियतव्यय ०४ कोटीपैकी, महिला व बालकल्याण नियतव्यय ८ कोटी ३८ लाख व दायित्व निधी ०१ कोटीपैकी, दिव्यांग वस्ती कल्याण ०२ कोटी १९ लाखपैकी, गतिमान प्रशासन आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण नियत व्यय ०६ कोटी ५८ लाखपैकी, सार्वजनिक जमिनीवर अतिक्रमणास प्रतिबंध संरक्षण भिंत नियतव्यय ०४ कोटी ५० लाखपैकी यावर डिसेंबर २०२५ अखेर एकही पैसा खर्च झालेला नाही.
तर निती आयोग आकांक्षीत तालुका नियतव्यय २० कोटी व दायित्व निधी ४ कोटी ५८ लाखपैकी केवळ ०६ टक्के, पोलीस व तुरुंग नियतव्यय ०८ कोटी ३८ लाख व दायित्व निधी ६ कोटी २२ लाखपैकी केवळ ०२ टक्के, क्रीडांगणाचा विकास ०१ कोटी ५० लाखपैकी केवळ ०७ टक्के, प्राथमिक/माध्यमिक शाळा दुरुस्ती/वर्ग खोल्या नियतव्य १२ कोटी व दायित्व १ कोटी ८३ लाखपैकी केवळ ०१ टक्का, आदर्श शाळांमध्ये विविध पायाभूत सुविधा नियत वेळ ०१ कोटी व दायित्व निधी ४१ लाखपैकी केवळ १३ टक्के, गट क्रमांक ०७, सामान्य आर्थिक सेवा नियत व्यय १९ कोटी २१ लाख व दायित्व निधी ०५ कोटी ६७ लाखपैकी केवळ १२ टक्के, एकूण मार्ग व पूल नियतव्यय २४ कोटी ५२ लाख व दायित्व निधी १२ कोटी ६५ लाखपैकी केवळ १४ टक्के, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधकाम व दुरुस्ती नियतव्यय ०४ कोटी ५० लाख व दायित्व निधी ०१ कोटी ५६ लाखपैकी केवळ ०६ टक्के, लघुपाट बंधारे बांधकाम नियत व्यय ०२ कोटी पैवŠr, ० ते १०० हेक्टर क्षमतेपर्यंत लघुप्ˆट बंधारे बांधकाम दुरुस्ती नियतव्यय १८ कोटी व दायित्व निधी १५ कोटी ७० लाखपैकी केवळ ०३ टक्के ,वनातील मार्ग व पूल नियतव्यय ०२कोटी व दायित्व निधी ०२ कोटी ०९ लाखपैकी केवळ १० टक्के, वनातील इमारती नियतव्यय ०२ कोटी ५० लाख व दायित्व तिथे ५५ लाख पैकी केवळ ०७ टक्के, मध्यवर्ती रोप मळे ६० लाखपैकी शून्य टक्के इतकाच खर्च डिसेंबर २०२५ अखेर झालेला आहे.
यातही नियतव्यय ३७५ कोटी व दायित्व निधी १३८ कोटी धरुन जानेवारी अखेर केवळ १२८ कोटी निधी वितरित झाला आहे.
भाग ३: जिल्हा विशेष घटक कार्यक्रम — अनुसूचित जाती
जिल्हा वार्षिक योजना विशेष घटक म्हणजेच अनुसूचित जातीसाठी विशेष तरतूद अंतर्गत डिसेंबर २०२५ अखेर नियतव्यय १४ हजारपैकी सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीज भांडवल, उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना अंतर्गत नियतव्यय ४ कोटी ८० लाख पैकी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुस्तक पेढ्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना हत्यार संच पुरवणे नियतव्यय दोन लाख ८० हजारपैकी, नागरी दलित वस्तीमध्ये सुविधा (महानगरपालिका) ०३कोटी ८७ लाख नियतव्यय नागरी दलित वस्तीमध्ये सुविधा (नगरपालिका) नियतव्यय ०४कोटी मिळून ०७ कोटी ८७ लाख ७६ हजारपैकी, जनजाती क्षेत्रात प्रसिद्धी कक्ष-जिल्हा माहिती अधिकारी नियतव्यय ७५ लाख पैकी, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती नियतव्यय पाच लाखपैकी, नाविन्यपूर्ण योजनेसाठी राखीव निधी नियतव्यय ४२ लाखपैकी एकही पैसा खर्च झालेला नाही.
अर्थात या अंतर्गत १४ कोटी तरतूदीपैकी केवळ ०३ कोटी इतका निधी यंत्रणाना देण्यात आलेला आहे.तर प्रशासकीय मान्यता देखील ५ कोटी खर्चाच्या कामांना मिळाल्याचे दिसते.