पालघर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नव्या नियुक्त्या;

Date: 2025-10-11
news-banner
https://youtu.be/lu1-sWHiqQc?si=8jhqxA_rRYfF9m24

📰 पालघर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर
उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नव्या नियुक्त्या; 

मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये पालघर जिल्हा प्रमुख(पालघर, डहाणू विधानसभा मतदारसंघ) म्हणून ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीश राऊत यांची तर विकास मोरे यांची विधानसभा पालघर, डहाणू, बोईसर मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यमान जिल्हा प्रमुख अजय ठाकूर यांचेकडे लोकसभा निरीक्षक, पालघर लोकसभा मतदारसंघ अशी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

विलास पोतनीस, माजी आमदार यांची संपर्कप्रमुख, पालघर लोकसभा मतदारसंघ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून गेल्या अनेक वर्षातील हा महत्त्वाचा बदल म्हणता येईल. याचबरोबरीने अमोल कीर्तिकर, उपनेते यांच्याकडे यंत्रणाप्रमुख, पालघर लोकसभा अशी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जिल्हा परिषद-पंचायत समित्या तसेच नगरपरिषदा-नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या करण्यात आल्याचे दिसते.

तपशील पुढीलप्रमाणे —

विलास पोतनीस, माजी आमदार — संपर्कप्रमुख, पालघर लोकसभा

अमोल कीर्तिकर, उपनेते — यंत्रणाप्रमुख, पालघर लोकसभा

विकास मोरे — सहसंपर्कप्रमुख, विधानसभा पालघर, डहाणू, बोईसर

गिरीश राऊत — जिल्हाप्रमुख, विधानसभा पालघर, डहाणू

अजय ठाकूर — लोकसभा निरीक्षक, पालघर लोकसभा

Leave Your Comments