सेवापूर्तीचा सन्मान : रत्नप्रभा तुकाराम किणी यांचा भावनिक सत्कार सोहळा
शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी असा उल्लेखनीय प्रवास करत रत्नप्रभा तुकाराम किणी यांनी ४० वर्षांची दीर्घ व निष्ठेची सेवा बजावून नियत वयोमानानुसार ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या गौरवासाठी कुटुंबीयांच्या वतीने एक सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘नवयुग पालघर’ साप्ताहिकाचे संपादक रमाकांत पाटील यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध वकिल दीपक भाते उपस्थित होते. व्यासपीठावर बहाडोलीच्या सरपंच सुनीता पाटील, टेन ग्रामपंचायतीचे सरपंच सदानंद गणेशकर, शिक्षणप्रेमी मुस्तफा राऊत, जनता ग्रामीणचे अध्यक्ष शरीफ पठाण, तसेच विस्तार अधिकारी चौधरी, माळी, इंगळे , वंदना पाटील आणि केंद्रप्रमुख गीता किणी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची खास आकर्षण ठरली रत्नप्रभा किणी यांच्या बालपणापासून ते शिक्षण विस्तार अधिकारी पदापर्यंतच्या प्रवासाची डॉक्युमेंटरी, जी त्यांचा मुलगा योगेश किणी यांनी सादर केली. पत्नी व मातोश्रींच्या सेवेला अभिवादन करण्यासाठी पती तुकाराम किणी, मुलगा योगेश व सून सुविधा किणी यांनी हा सोहळा आयोजित केला.
किणा r यांच्याविषयी अनुभव मांडताना सांगली–मिरज येथून तब्बल ४५० किलोमीटर प्रवास करून त्यांच्या सहकार्यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. “आमच्यासाठी त्या केवळ सहकारी नव्हत्या, तर आईसमान होत्या,” अशा शब्दांनी संपूर्ण सभागृह भावूक झाले. अनेक वक्त्यांनी आपल्या आठवणी सांगताना दाद व अश्रू दोन्ही देत किणी यांच्या उल्लेखनीय सेवेबद्लच्या भावना ब्यक्त केल्या.
कार्यक्रमास मोठी उपस्थिती राहिली.ऍड.दीपकभाते,रमाकांत पाटील यांच्यासह विस्तार अधिकारी व सहकारी तसेच कुटुंबियांनी किणी यांच्या गुणांची प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरी भोईर तर प्रास्ताविक वैभव कुडू यांनी केले.