विरार — डहाणू मार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामुळे विरार स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या फलाटांमध्ये ( प्लॅटफॉर्म्स) बदल; प्रवाशांसाठी सूचना

Date: 2025-12-19
news-banner
विरार — डहाणू मार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामुळे विरार स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या फलाटांमध्ये ( प्लॅटफॉर्म्स) बदल; प्रवाशांसाठी सूचना

पश्चिम रेल्वे (Western Railway) कडून हाती घेण्यात आलेल्या विरार - डहाणू चौपदरीकरण ( ३–४ रेल्वे मार्गिका (third & fourth line) प्रकल्पाअंर्तगत, विरार — डहाणू रोड (VR–DRD) दरम्यानच्या रेल्वे मार्गिका कामासाठी विरार स्थानकावरील काही महत्त्वाचे बदल ०४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८:०० वाजल्यापासून लागू झाले आहेत. 

यानुसार, प्रवाशांना आणि स्थानक वापरणाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे:

विरार स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3A वरील कोणतीही ट्रेन आता पुढील सूचना निघण्या पर्यंत चालू राहणार नाही.

दररोज रात्री 01:30 ते 04:30 या वेळेत प्लॅटफॉर्म 4A वर ब्लॉक लागणार आहे; या वेळात 4A बंद राहील. (हा ब्लॉक रोज स्वतंत्र मेमोद्वारे घेतला जाईल.)

पुढील UP गाड्या आता 4A वर घेतल्या जातील: DN93006, DN93012, DN93018, DN93020, DN93024, DN93030, DN93032.

पुढील Down गाड्या 4A वरून सुटतील: DN93013, DN93021, DN93025, DN93 027, DN93029, DN93037, DN93039.

काही गाड्या इतर प्लेटफार्म्सवर हाताळल्या जातील:

DN93016 आणि DN93023 गाड्या विरारमध्ये प्लॅटफॉर्म 6 वरून हाताळल्या जातील.


प्रवास, साइडिंग आणि रिकामी रेल्वे रेक व्यवस्थापन:

DN93020 गाडी विरार स्टेशनला आल्यानंतर, तिचा रेक NWS सायडींग मध्ये ठेवला जाईल; हे रेक पुढील DN93029 गाडी चालवण्यासाठी वापरले जाईल.

DN93024 गाडी आल्यानंतर, तिचा रेक DN93027 साठी वापरण्यात येईल.

DN93030 गाडी आल्यानंतर, तिचा रेक NWS सायडींगमध्ये ठेवला जाईल आणि तो पुढील DN93039 साठी वापरण्यात येईल.

DN93032 गाडीचा रेक पुढील DN93037 साठी वापरण्यात येईल.


विशेष: गाड्या VR92083 व VR92100 या दोन्ही गाड्या आता विरारमध्ये न येता वसई रोड (BSR) येथेच संपवल्या/सुरू केल्या जातील (short-terminate / originate).

Down कॉरिडॉर ब्लॉक संपल्यानंतर, म्हणजे दररोज सकाळी 04:30 नंतर, गाडी 69161 (DRD–VR MEMU) विरारमध्ये घेतली जाईल.


विरार — डहाणू दरम्यानच्या अनेक वर्षे प्रलंबित चौपदरीकरण प्रकल्प अंतर्गत कामाच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत. 

प्रवाशांना विनंती आहे की:

येणाऱ्या वेळापत्रकात (time-table) होणारे बदल लक्षात घ्यावेत.

विशेषत: रात्री 1:30 ते 4:30 च्या ब्लॉक वेळेत 4A वापरावर निर्भर गाड्यांसंदर्भात प्रवाशांनी पर्यायी नियोजन करावे.

कोणतीही तात्पुरती सूचना किंवा बदल असल्यास रेल्वे प्रशासनाकडून पुढील सूचना अवश्य बघाव्यात.

Leave Your Comments