नवयुग पालघर विशेष :
रोटरी ‘पिंक ऑटो’ उपक्रम : मुंबई–पालघरमध्ये १,००० महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा
मुंबई / पालघर :
महिला सशक्तीकरणाला बळ देणारा आणि आर्थिक स्वावलंबनाचा ठोस मार्ग उघडणारा ‘रोटरी पिंक ऑटो’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 तर्फे राबविण्यात येत असून, मुंबई व पालघर जिल्ह्यात लवकरच १,००० पिंक ऑटो रिक्षा रस्त्यावर धावणार आहेत. या प्रकल्पामुळे १,००० महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना स्थिर उत्पन्नाचा आधार मिळणार आहे.
या उपक्रमाची औपचारिक सुरुवात मुंबईतील मुलुंड येथे १० पिंक ऑटो रिक्षांच्या वितरणाने करण्यात आली. हा सोहळा रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष फ्रान्सिसको अरेझु आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मनीष मोटवानी यांच्या शुभहस्ते पार पडला.
महिलांसाठी सर्वंकष सहाय्य
‘पिंक ऑटो’ योजनेअंतर्गत महिलांना—
मोफत ऑटो ड्रायव्हिंग प्रशिक्षण
लायसन्स, बिल्ला व परमिट मिळवण्यासाठी मार्गदर्शन
सवलतीच्या दरात ऑटो रिक्षा
कर्जासाठी विशेष सहाय्य
डाउन पेमेंटची व्यवस्था
अशी सर्वंकष मदत दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक रोजगाराची संधी मिळणार आहे.
पात्रता निकष
किमान ७ वी उत्तीर्ण
महाराष्ट्रात किमान १५ वर्षांचे वास्तव्य
आधार कार्ड व पॅन कार्ड
राष्ट्रीयीकृत बँकेत खाते
कोणताही गुन्हेगारी / घरगुती हिंसाचाराचा पोलीस रेकॉर्ड नसणे
स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्वावलंबनाची ओळख
रोटरी पिंक ऑटो हे केवळ वाहतुकीचे साधन नसून महिलांच्या स्वाभिमानाची, सुरक्षिततेची आणि स्वावलंबनाची ओळख ठरणार आहे. या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत कुटुंबाच्या अर्थकारणात निर्णायक भूमिका बजावतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
विशेष आवाहन
या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरीचे जिल्हा मुख्य समन्वयक भगवान पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक महिलांनी संपर्क साधावा.
संपर्क:
रो. भगवान पाटील – ९९२२९५९३५५
रो. राजेश सामंत – ९८२३६६६७७६