मुंबई महापालिका परिचारिका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

Date: 2026-06-14
news-banner
बृहन्मुंबई महानगरपालिका

श्री हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, बोरीवली (प), मुंबई 400 103.

एचओ/924/बीएच (एनटीसी) दि. 10.06.2026

जाहिरात

सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रम ( ३ वर्ष) फक्त महीला उमेदवारांकरीता

दिनाक 01.08.2026 पासून खालील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिचर्या प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरु होणा-या सामान्य परिचर्या व प्रसूतिशास्त्र अभ्यासक्रमाकरिता प्रशिक्षण घेउ इच्छिणा-या महिला उमेदवाराकडून मुबंई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर संगणकीय (ऑनलाईन) पध्दतीने विहीत प्रपत्रांमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. 
http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा या संदर्भामध्ये GNM NURSING ADMISSION या शीर्षका खाली प्रवेश प्रकीये विषयी माहीती व वेळापत्रक दिनांक 12.06.2026 पासुन उपलब्ध करुन देण्यात येईल यांची नोंद घ्यावी. 
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 18.06.2026 ते दि. 29.06.2026.

1. रा.ए स्मारक रुग्णालय, परळ मुंबई-400012.

2. बा.य.ल नायर धर्मा रुग्णालय, मुंबई सेंट्रल, मुंबई 400008.

3. लो.टी.म.स. रुग्णालय, सायन, मुंबई 400022.

4. डॉ. आर. एन कूपर रुग्णालय, विलेपार्ले, मुंबई 400056.

5. श्री. हरीलाल भगवती रुग्णालय बोरीवली, मुंबई 400103.

निवड झालेल्या उमेदवारांना सामान्य परीचर्या व प्रसूतिशास्त्र अभ्यासक्रमासोबत सार्वजनिक आरोग्य परिचर्या आणि प्रसूतिशास्त्र आंतरवासीहासहीत 3 वर्ष अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. (अभ्यासक्रमाचा कालावधी व अभ्यासक्रमाचे विषय भारतीय परिचर्या परिषद व महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ यांच्या ठरावासापेक्ष).

स्त्री उमेदवारानी रुग्णालयाशी सलंग्न असलेल्या निवास स्थांनामध्ये (वसतीगृहामध्ये) रहाणे अनिवार्य आहे.

विद्यावेतन दरमहा रु. 100-110-120 अधिक 680/- गणवेश भत्ता अधिक रु.300/- धुलाई भत्ता अधिक मोफत वसतीगृह निवासस्थान व मोफत भोजन या सुविधा आहेत.

अर्हता -

1. उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शांलात प्रमाणपत्र परिक्षा (10+2) अथवा समतुल्य परीक्षा शासन मान्य संस्थेतून प्राधान्याने जीवशास्त्र, रसायनशास्त, भौतिकशास्त्र (BIOLOGY, CHEMISTRY, PHYSICS)

Leave Your Comments