🚆 पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे सेवांच्या सुधारण्यासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांचा रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा
पालघर | प्रतिनिधी
पालघर लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रलंबित रेल्वे थांबे मंजूर व्हावेत यासाठी खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी रेल्वे बोर्डाकडे मागण्यांचा पाठपुरावा केला आहे. या संबंधीची महत्त्वपूर्ण निवेदने त्यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांना सादर केली आहेत.
खासदार डॉ. सवरा यांनी निवेदनांमध्ये पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत –
1. कुंभमेळा निमित्ताने तात्पुरती सुरू केलेली,
उधना विशेष गाडी (क्र. ०९०५५/५६) दररोज / नियमित करण्यात यावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
2. अंधेरी–डहाणू रोड सायंकाळची लोकल सेवा सुरू करून गर्दीचा ताण कमी करावा.
3. पहाटे ४ वाजताची डहाणू रोड–चर्चगेट लोकल सुरू करावी.
4. सायंकाळी डहाणू-विरार व विरार-डहाणू रोड लोकल सेवा (६.०० ते ६.१५ वा. आणि ५.३० ते ६.०० वा.) सुरू करण्याची मागणी.
5. विरार–डहाणू मार्गावर १५ डब्यांच्या ईएमयू गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव
तसेच, पालघर स्थानकावर
१२९३५/१२९३६ बांद्रा–सूरत इंटरसिटी एक्सप्रेस
२०९४१ /२०९४२ बांद्रा–गाझीपूर एक्सप्रेस
गाड्यांचे थांबे मंजूर करावेत
याशिवाय, नवीन थांबे मंजुरीसाठी
२०४९५/२०४९६ जोधपूर–हडपसर (पुणे) एक्सप्रेस
१२९७१ /१२९७२ बांद्रा–भावनगर एक्सप्रेस या गाड्यांचा प्रस्ताव दिला आहे –
पालघर जिल्ह्यातील वाढणारी औद्योगिक व वाहतूक मागणी लक्षात घेता मुंबई–अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस (१२००९/१२०१०) याचा थांबा पालघर येथे देणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. सवरा यांनी नमूद केले आहे.
“पालघर जिल्हा वेगाने विकसित होत आहे. येथे वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ, सागरी महामार्ग आणि मुंबई–दिल्ली एक्सप्रेसवे यांसारखे मोठे प्रकल्प सुरू असल्याने. रेल्वेसेवा सुधारणा गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.”