https://youtu.be/HZuKNbYh920?si=2XLFANtP4ZfGiHWU
📰 डहाणूत राजकीय घडामोडी – विविध पक्षांच्या मान्यवरांचा शिवसेनेत प्रवेश
डहाणू, १६ ऑक्टोबर –
डहाणूत आज झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे स्थानिक राजकारणात नवीन घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांतील मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी, शिक्षण क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते मिलिंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सईद शेख, भाजपाचे माजी शहराध्यक्ष मिलिंद माळवे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका माधुरी धोडी, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खुताडे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष वैभव मर्दे, उभाठाचे माजी उपशहर प्रमुख हसमुख धोडी, तसेच आसवे ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू गुरोडा, उपसरपंच पिंटू सावरा आणि सर्व सदस्य, तसेच सावटा ग्रामपंचायत सदस्य हितेश माच्छी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला.
या प्रवेशामुळे डहाणू नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाला आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, उपनेते निलेश सांबरे, उपनेत्या ज्योती मेहेर यांसह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “डहाणू नगरपरिषदेतील आणखी काही पदाधिकारी लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील,”