https://youtu.be/iGCL_oUM20c?si=dt2OHQPp9S_zt6NL
राज ठाकरे यांच्या आमंत्रणावर उद्धव ठाकरे दीपोत्सवात सहभागी होणार — महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण
पालघर :
दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या उदघाटनासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या प्रगतीतील ही एक मोठी झेप मानली जात असून, दोन्ही भावंडांचे एकत्र येणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
ही घटना राज्याच्या राजकीय घडामोडींमध्ये एक नवा अध्याय ठरू शकते, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. ते पालघर येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनानिमित्त पत्रकारांशी संवाद साधत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या "आता भावाची आठवण आली" या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले,
> “त्यांना अमित शहांची आठवण नाही येणार, भावाचीच आठवण येणार. अमित शहांची आठवण आली तर आम्ही काय दिल्ली आणि सुरतला जाऊ का?”
असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या वादावर भाष्य करताना राऊत म्हणाले की,
> “या वादाची अखेरीस परिणती गणेश नाईक यांच्या विजयातच होईल. नाईक यांनी पक्ष सोडला असेल, पण संयम कधीच सोडलेला नाही. ते कसलेले पैलवान आहेत,”
असे म्हणत त्यांनी गणेश नाईक यांची एकप्रकारे प्रशंसा केली.