टेंभोडे तलाव सुशोभीकरणातील तलाव आटवण्यात खर्च होणारे, २४ लाख वाचवण्यासाठी प्रशासन उदासीन ?

Date: 2025-11-18
news-banner
https://youtu.be/PlAJNm8XViE?si=VqFGb-YKXuSMOPKN

टेंभोडे तलाव सुशोभीकरणातील तलाव आटवण्यात खर्च होणारे, २४ लाख वाचवण्यासाठी प्रशासन उदासीन ?

पालघर : पालघर नगरपरिषद तब्बल २४ लाख रुपये अक्षरशः पाण्यात घालवत असल्याचे जिल्हाधिकारी तसेच नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही प्रशासन हे काम थांबविण्यात अपयशी ठरले आहे . टेंभोडे महाविद्यालय व पालघर–खारेकुरण रस्त्यालगतच्या तलावांचे सुशोभीकरणाचे काम घाईघाईने सुरू केल्यानंतर आता पंप व पाईपलाईन द्वारा तलाव कोरडा करण्याचे काम सुरू आहे, साहजिकच प्रशासन कोणापुढे हतबल आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
.
१० कोटी खर्चाच्या तलाव सुशोभीकरण कामांतर्गत, 
तलावातील पाणी काढण्यासाठी अंदाजपत्रकात २३ लाख ८० हजार ९२८ रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. हा तलाव येत्या दोन तीन महिन्यांत नैसर्गिकरित्या आटणार आहे. अशा स्थितीत २४ लाख रुपये खर्चून तलाव आटवण्याची गरज नक्की काय? अशा प्रकारचे तलाव परिसरातील भूगर्भातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी मदत करत असतात.. शासन पाणी अडविण्यासाठी मोठा खर्च करते . इथे नेमके उलट प्रवास सुरू झाला आहे. "हा खर्च जनतेच्या तिजोरीवरचा डल्लाच आहे.

घाईघाईने काम सुरू करण्यामागे नेमके कोणते कारण आहे ? तलावा सभोवतालची भिंत हे तातडीने करावयाचे काम कसे ? या प्रश्नांची उत्तरे न देताच ठेकेदार हे काम रेटून नेत आहे . प्रशासनाची ठेकेदाराला असल्याखेरीज हे घडूच शकत नाही .

Leave Your Comments