https://youtu.be/ZjNmXtJTaRg?si=tvMXV-XgWb-xduyL
पालघर — उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन; शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचे प्रभावी भाषण (अनकट)
पालघर, शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत पक्षनिष्ठा, संघटन आणि संघर्षाची परंपरा अधोरेखित केली.
तप्त उन्हात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांचे कौतुक करत राऊत यांनी ठणकावून सांगितले की — “शिवसेना संपवण्याची भाषा करणारे संपले; पण बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कायम उभी राहील.”
भाषणाच्या प्रत्येक ओळीत पक्षावरील निष्ठा, शिंदे-भाजपवर टोकाची टीका, आणि शिवसैनिकांना संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन यांचा स्पष्ट सुर उमटला.
🔶 संपूर्ण (अनकट) भाषण : खासदार संजय राऊत, पालघर, १७ ऑक्टोबर २०२५
मला पालघरमधील शिवसैनिकांचे कौतुक वाटते... एवढ्या तप्त उन्हामध्येही शिवसैनिक, पदाधिकारी आहेत, व्यासपीठ भरलेलं आहे, समोरचा मंडप भरलेला आहे.. मग गेले कोण? सगळे आहेत इथे... महिला आघाडीही जागीच आहे... गेले ते...
पालघरच्या शिवसेनेमधील ठेकेदारांची सेना गेली.
आज येथील सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करतो की तुम्ही पालघरमध्ये मध्यवर्ती कार्यालय सुरू केलं.
जेवढ्या शाखा स्थापन कराल तेवढा पक्ष वाढत जाईल.
मुंबई, ठाण्यात बाळासाहेबांनी शाखांचं जाळ निर्माण केलं... त्यामुळे अनेक वादळं, संकट आली तरी शिवसेना खंबीरपणे उभी राहिली आणि ती तशीच राहील.
आपण भाषणात सांगितलं, “कवरे आले आणि कवरे गेले... पण शिवसेना तर आहे ना!”
आपण हाव , तो हाव... पुन्हा एकदा इकडे शिवसेना उभारी घेईल...
शिवसेना संपवण्याची भाषा करणारे संपले.
साठ वर्ष होत आली, कवरे आले आणि कवरे गेले...
बाळासाहेबांच्या काळात पण आले आणि गेले, उद्धवजींच्या काळात पण आले आणि गेले...
“आम्ही आहोत तेथेच आहोत सगळे.”
अरे पाच आमदार इकडे-तिकडे आणि दोन खासदार इकडे-तिकडे...
आज पालघरला आमदार नसेल पण उद्या असेल.
“चोऱ्या करून आलेत तुम्ही...”
चोऱ्या करून आले, खोटे मतदान, मतदार यादीतील घोटाळे...
एखाद्या झिरो नंबरच्या घरात शंभर शंभर मतदार, आई–बापाचा पत्ता नाही, बिनबापाची पोरं, शंभर मतदार... बापाचं लग्न झालेलं नाही...
सांगलीमधील एक बाप शोधला; त्याच्या घरात ९० मतदार... १४ पोरे, ४२ वर्षाची... एकाच दिवशी जन्माला आलेली...
या अशा मतदार याद्या महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम भाजपाचं...
तुमचा पैसा आणि पैशानं निवडणुका जिंकणं...
ते फार काळ टिकत नाही...
“बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या पैशाच्या प्रवाहाबरोबर कधीही वाहत गेली नाही.”
हे त्या एकनाथ शिंदेला जाऊन सांगा.
मी तर नेहमीच सांगतो, “तुझा पैसा तुझ्यापाशी, निष्ठा आमच्यापाशी...”
ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे; शिंदेच्या बापजाद्यांची नाही.
आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे काय वैभव आहे? हे समोर दिसतंय...
ही भाड्याची लोक नाहीत, अजिबातच नाही...
हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात खास करून कोकण, मुंबई, ठाणे, पालघर येथून शिवसेना कधीही नष्ट होणार नाही.
आज तुम्हाला जे काही चित्र दिसत आहे ते चित्र म्हणजे “वाऱ्यावरची वरात आहे...”
त्या एकनाथ शिंदेचा पक्ष कुठला... “माझी शिवसेना... माझी शिवसेना...”
अरे, शिवसेनेचा जन्म दाखला घेऊन ये...
तुझ्या शिवसेनेचा बाप अमित शहा... तुझ्या शिवसेनेचा बाप नरेंद्र मोदी...
“दोन बाप तुला!”
आमचा एकच बाप — बाळासाहेब ठाकरे — हिंदुहृदयसम्राट!
आणि त्या बापाशी सामना करायचा प्रयत्न करू नका.
या पालघरमध्ये शिवसेना कालही होती, आज आहे, उद्याही राहील.
मला मघाशी आपल्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कानात सांगितलं होतं —
“साहेब, आम्हाला मीटिंगसाठी जागा नव्हती…”
आज कार्यालयामुळे महिला आघाडीची सुद्धा व्यवस्था झाली आणि पक्षाची सुद्धा व्यवस्था झाली.
हे पक्षाचं काम आहे... जर पक्ष नसता तर आपलं कार्यालय कसं उभं राहिलं असतं?
जे शिवसैनिक इथे जमले आहेत त्यांनाही जाता आलं असतं...
जातं कोण?
“लाभार्थी जातात...”
इथेही लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आहेत ना? पंधराशे रुपायाला पगारी मतदान...
लाडक्या बहिणी म्हणजे एकनाथ शिंदेने पगारी मतदार नोंदविले आहेत.
पगार घ्या आणि मत द्या...
हे स्वाभिमानाचं काम नाही.
“आम्हाला रोजगार पाहिजे!”
या पालघरमध्ये संघर्ष करण्याचं काम शिवसेनेने केलं आहे.
बुलेट ट्रेन येतेय...
बुलेट ट्रेन कोणासाठी? आमच्यासाठी?
अहमदाबाद, सूरत येथील सर्व हिरे व्यापारी मुंबईला येणार...
मुंबई लुटून परत अहमदाबादला जाणार!
बुलेट ट्रेनमध्ये तुम्ही-आम्ही जाणार आहोत का?
वाढवणला अदानी येतोय... कुठे जिंदाल येतोय... कुठे अंबानी येतोय...
हे कोणासाठी आहे?
हे मराठी माणसासाठी नाहीये, भूमिपुत्रासाठी नाहीये, हे आपला महाराष्ट्र आपल्यापासून तोडण्यासाठी आहे...
भांडवलदार, कारखानदारीला विरोध नाहीये.
या भागात कितीतरी मोठी कारखानदारी आहे.
पण त्या कारखानदारीवर आपला अंकुश आहे.
पण हे सगळे मोदी–शहाचे भांडवलदार येथे येणार आणि
“आमची लूट करणार, आमच्या जमिनी घेणार, आमचा शेतकरी संपवणार, आमच्या नोकऱ्या संपवणार...”
यासाठी संघर्ष करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती आमच्या मूळ, ओरिजिनल शिवसेनेमध्ये... बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहे!
आणि त्याची उत्तम सुरुवात आपण हे मध्यवर्ती कार्यालय स्थापन करून केली आहे.
“हा संघर्षाचा केंद्रबिंदू आहे; इथून लढाई आणि युद्ध सुरू होईल — हे वॉर रूम आहे!”
लक्षात ठेवा — संघर्ष इथून सुरू व्हायला पाहिजे...
आणि जिथे संघर्ष आहे तिथे संजय राऊतांना केव्हाही बोलवा, ते तेथे हजर आहेत.
“दोन ठिकाणी मी जातो — शाखेचे उद्घाटन असेल त्या ठिकाणी...”
शाखा म्हणजे मंदिर आहे आपल्यासाठी...
आणि आंदोलन व संघर्ष हा आमचा आत्मा आहे, पक्षाचा...
पालघर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की —
“इथे पक्ष संघर्षातून उभा करायचा आहे.”
कशाचीही पर्वा न करता आम्हाला संघर्षाला सामोरे जायचं आहे.
कोणताही कायदा आणि कोणतीही दडपशाही तुम्हाला रोखू शकत नाही.
मला टाकलं होतं तुरुंगात.... म्हटलं चला... शिवसैनिक आहे मी.
ईडी आहे... कसली ईडी—फिडी...
“ईडी-पीडीला घाबरतो काय आम्ही?”
शंभर दिवसांपेक्षा जास्त काळ मला तुरुंगात टाकलं...
त्यांना वाटलं मी मोडून पडेल, पक्षांतर करीन, मोदीच्या पक्षात जाईन, शिंदेच्या पक्षात जाईल...
मी म्हटलं — “थुंकतो तुमच्यावर! बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे.”
आज आम्ही उभे आहोत ते शिवसैनिक म्हणून उभे आहोत...
आमदार-खासदार म्हणून नाही. ते येतात आणि जातात...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दोन महत्त्वाची पदे निर्माण केली —
स्वतः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एकच...
आणि अधेमध्ये कोणीही नाही — थेट शिवसैनिक!”
बाकीचे कोणी येतील आणि जातील...
पण शिवसैनिक पदाला कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही.
असे असंख्य शिवसैनिक आपल्या जिल्ह्यात आहेत.
त्यांना एकत्र करा.
गावागावात जा. घरापर्यंत पोहोचा.
गावात शाखा निर्माण करा.
शाखेत कार्यकर्ते — गावकरी येतील; यासाठी तुम्ही उपाययोजना करा, त्यांना प्रेरणा द्या...
“आजही देशात बाळासाहेब ठाकरेंवर श्रद्धा ठेवणारा मोठा समाजवर्ग आहे.
मोदीवर श्रद्धा नाही; मोदीची सत्ता आहे म्हणून लोक घाबरतात...
श्रद्धा आणि विश्वास फक्त बाळासाहेब ठाकरेवर आहे.”
एवढा मोठा आमचा नेता होता... सेनापती होता... त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे.
पालघरला येऊन मला खूप आनंद झाला.
यापुढे जास्त वेळ तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करीन...
सर्व जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, सर्व विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना प्रमुख, कामगारसेना, महिला आघाडी —
जे जे येथे काम करत आहेत, त्या सर्वांना एकत्र आणण्याचे काम उत्तम पिंपळे, तुम्ही या कार्यालयात करावं.
आता इथे तुम्हाला उत्तम संपर्कप्रमुख मिळाले आहेत —
विलास पोतनीस, अमोल कीर्तीकर सारखे यंत्रणा प्रमुख; बाळ माने येऊन गेले...
एवढं चांगलं नेतृत्व तुम्हाला मिळालं आहे, त्याचा वापर करून घ्या.
आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा मला बोलावून घ्या...
“आदित्य साहेब येतील, उद्धव साहेब इथे येतील...
त्यांना येथे आणण्याची जबाबदारी आमच्यावर असेल.”
📍 — संजय राऊत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), पालघर, १७ ऑक्टोबर २०२५