बोईसर औद्योगिक वसाहतीत ‘शिव इंडस्ट्री’ला आग

Date: 2026-03-19
news-banner
**बोईसर औद्योगिक वसाहतीत ‘शिव इंडस्ट्री’ला आग **

पालघर : बोईसर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. J-162/163 येथील ‘शिव इंडस्ट्री’ कंपनीच्या गोडाऊनला मंगळवार १७ मार्च रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास आग लागली. LDO इंधन टँकरमधून पाईपद्वारे प्रक्रिया सुरू असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच तारापूर औद्योगिक वसाहत ३, भाभा अणुसंशोधन केंद्र १ आणि पालघर नगरपरिषदेची १ अशा एकूण
 ५ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे काम केले आहे. गोदामात एलडीओ(LDO) टँकर तसेच इतर ड्रम्स साठवलेले होते.
 या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे.

Leave Your Comments