महिला कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेत ‘हिरकणी कक्ष

Date: 2026-05-19
news-banner
नवयुग पालघर 

**महिला कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेत ‘हिरकणी कक्ष**

               जिल्हा परिषद पालघर येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा असलेल्या ‘हिरकणी कक्षा’चे उद्घाटन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सुसज्ज व सोयीस्कर विश्रांतीची जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

             यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीकमसलत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, शिक्षणाधिकारी अशोक पाटील तसेच रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक योगेश जोशी व सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक सोहम पाटील उपस्थित होते.

           मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) इजाज अहमद शरीकमसलत यांच्या नियोजनातून जिल्हा परिषद भवनाच्या दुसऱ्या मजल्यावरील कक्ष क्रमांक २०४ चे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. बांधकाम विभागामार्फत अंतर्गत रचना आणि फर्निचरची मांडणी करण्यात आली.
रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने कक्षासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यामध्ये आकर्षक फलक, रंगरंगोटी, पाळणा, खेळणी, कपाट, खुर्च्या तसेच माहितीपर पोस्टर्सचा समावेश आहे.

             हा कक्ष विशेषतः महिला कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आला असून, विश्रांती, स्तनपान तसेच लहान मुलांसह कार्यालयात येणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Leave Your Comments