पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Date: 2024-11-16
news-banner
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालघर सह संपर्कप्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भारती कामडी यांचा पक्षप्रवेश पार पडला.

Leave Your Comments