बुधवार २० नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात होईल मतदानाची समाप्तीची वेळ संध्याकाळी सहा वाजता ची आहे.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २२ लाख ९२ हजार ०६६ मतदार असून यामध्ये महिला ११ लाख ०४ हजार २४६ तर पुरुष मतदार ११ लाख ८७ हजार ५८९ व इतर २३१ अशी विभागणी आहे. जिल्ह्यात एकूण २२७८ मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १२८ डहाणू विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी राखीव असून यात ०३ लाख ०१ हजार २३९ मतदार आहेत. यापैकी महिला ०१ लाख ५१ हजार ५७८, पुरुष ०१ लाख ४९ हजार ६२७ तर इतर ३४ अशी विभागणी आहे. येथे ३३१ मतदान केंद्र आहेत. १२९ विक्रमगड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी राखीव आहे.या मतदारसंघात ०३ लाख १७ हजार ७४१ मतदार असून यापैकी ०१ लाख ५९ हजार ५५२ महिला तर ०१ लाख ५८ हजार १८८ पुरुष मतदार व इतर एक मतदार आहे. ३५८ मतदान केंद्रांवर येथे मतदान होणार आहे.
१३० पालघर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी राखीव आहे. या मतदारसंघात ०२ लाख ९८ हजार ५७९ इतके मतदार असून यामध्ये महिला ०१ लाख ४९ हजार ४६८ तर पुरुष ०१ लाख ४९ हजार ०९० व इतर २१ मतदार आहेत. ३२४ मतदान केंद्रांवर येथे मतदान होणार आहे.
१३१ बोईसर मतदारसंघ देखील अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी राखीव आहे. या मतदारसंघात ०४ लाख ११ हजार ३२९ मतदार असून यापैकी ०१ लाख ८९ हजार ०२२ महिला तर ०२ लाख २२ हजार २६४ पुरुष व इतर ४३ मतदार आहेत. येथे ४०४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघ खुला मतदार संघ असून येथे जिल्ह्यातील सर्वाधिक सहा०६ लाख ०८ हजार ५२६ इतके मतदार आहेत. यात ०२ लाख ८१ हजार ८८४ महिला तर ०३ लाख २६ हजार ५२२ पुरुष व इतर १२९ मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक ५०७ मतदान केंद्रांवर येथे मतदान होणार आहे.
१३३) वसई विधानसभा मतदारसंघ खुला असून येथे ०३ लाख ५४ हजार ६५२ मतदार असून यापैकी ०१ लाख ७२ हजार ७४२ महिला तर ०१ लाख ८१ हजार ८१८ पुरुष व इतर १२ मतदार आहेत. येथे ३५४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यात सैनिक मतदारांची संख्या ३२६ इतकी आहे यात सर्वाधिक विक्रमगड १२१, त्या खालोखाल नालासोपारा ८३, बोईसर ४४, वसई ३१ पालघर २९ व डहाणू १८ सैनिक मतदार आहेत.....