आचार संहिता पथक तसेच राज्य उत्पादन शुल्क यांचेमार्फत केलेल्या कारवाईत २२ कोटीची जप्ती

Date: 2024-11-19
news-banner
आचार संहिता पथक तसेच राज्य उत्पादन शुल्क यांचेमार्फत केलेल्या कारवाईत २२ कोटीची जप्ती

1. जप्त केलेली रोकड रक्कम - १६ कोटी १४ लाख १२ हजार

2. लिकर (दारू) र २५०७३७.५२ लिटर (अंदाजित किंमत ०२ कोटी ४६ लाख २५ हजार 

3. अमली पदार्थ तंबाखू, गुटखा यासारखे पदार्थ अंदाजित किमत २६ लाख ८२ हजार

4. जप्त केलेल्या इतर वस्तू (उदा. लॅपटॉप, सारी, कुकर्स, वाहन इ.) अंदाजित किंमत ६५ लाख ०७ हजार

5. प्रोबोज ०२ कोटी ४७  लाख ९८ हजार

6. एकूण  २२ कोटी,०१ लाख ०१ हजार


 * मतदारांना प्रलोभन दाखविण्याच्या प्रयोजनासाठी उमेदवार त्यांचे प्रतिनिधी किंवा पक्ष कार्यकर्ता यांच्या वाहनातुन रु. ५०,०००/- पेक्षा अधिक रक्कम वाहून नेत असल्यास किंवा १०,०००/- पेक्षा अधिक रुपयांचे अमली पदार्थ, दारु, बक्षिस, वस्तु किंवा निवडणुक सामुग्री असल्यास अशा सामुग्री जप्त करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत.
       यानुसार पालघर जिल्हयांतर्गत कार्यरत स्थिर निरिक्षण पथक (SST), फिरते निरिक्षण पथक (FST, চ उत्पादन शुल्क विभाग व पोलिस पथकाकडुन १८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत 
(१) रोख रक्कम रु १ कोटी ६१ लाख ४१२ 
(२) अमली पदार्थ १९.०३ किलोग्राम रक्कम रु.२६ लाख ८२ हजार 
(३) दारु २,५०,७३७.५२ लिटर किंमत रक्कम २ कोटी ४६ लाख २५ हजार
(४) निवडणुक प्रचार साहित्य रक्कम रु. १४ लाख ४५ हजार
(५) मौल्यवान वस्तु रक्कम रु. ६५ लाख ०७ हजार
(६) इतर साहित्य रक्कम रु. २ कोटी ३५ लाख ५४ हजार 
याप्रमाणे एकुण रक्कम रु. २२ कोटी २३ हजार किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यापैकी निवडणुकीशी संबंधित नसलेली जिल्हास्तरीय रोख मुल्यवान मुक्तता समितीच्या मान्यतेने एकुण रोख रक्कम रु ४ कोटी ४१ लाख ८० हजार मुक्त करण्यात आली तसेच निवडणुक प्रचार साहित्य रु. १४ लाख ४५ हजार मुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.*

Leave Your Comments