https://youtu.be/hPXy1wv8GC0?si=AftAsz68-NsYF-yk
‘अॅनिमिया मुक्त भारत’ या राष्ट्रीय मोहिमेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोटरॅक्ट क्लब ऑफ पालघर यांच्या वतीने रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी ‘सायकलाथॉन 3.0’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या या सायकलाथॉनमध्ये पालघर जिल्ह्यासह परिसरातील सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
रोटरॅक्ट क्लब ऑफ पालघरच्या अध्यक्षा रोट्रॅक्ट. गार्गी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाची प्रकल्प अध्यक्ष (Project Chairman) म्हणून जबाबदारी रोट्रॅक्ट. सानू पासवान यांनी सांभाळली.
या सायकलथॉनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी सहभागींस मार्गदर्शन करत सामाजिक जबाबदारी, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व आणि समाजाच्या सर्वांगीण आरोग्याबाबत मौलिक विचार मांडले. निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी नियमित व्यायाम व सायकलिंग आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
‘सायकलथॉन 3.0’ आयोजनामागील मुख्य उद्देश ‘अॅनिमिया मुक्त भारत’ या मोहिमेबाबत जनजागृती करणे हा होता. सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्य, तंदुरुस्ती आणि सामाजिक जागरूकतेचा प्रभावी संदेश देण्यात आला.
या उपक्रमात एकूण सुमारे १०० सहभागी सहभागी झाले होते. डहाणू, विरार, सफाळे तसेच पालघर परिसरातील सायकलप्रेमींनी प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व सहभागींचा पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आनंदी व उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.