गालतरे व पालघर येथे आयोजित दोन स्वतंत्र भरती शिबिरात ५८ युवक-युवतींना नियुक्ती पत्रे

Date: 2026-03-21
news-banner
**गालतरे व पालघर येथे आयोजित दोन स्वतंत्र भरती शिबिरात ५८ युवक-युवतींना नियुक्ती पत्रे **

          गालतरे, ता. वाडा व पालघर येथे आयोजित दोन स्वतंत्र भरती शिबिरात ५८ युवक-युवतींना नियुक्ती पत्रे देण्यात आली . यातील वाडा तालुक्यातील गोवर्धन कौशल्य केंद्र, गालतरे येथे १६ मार्च रोजी आयोजित भरती शिबिरात ६० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या उपक्रमात जिल्ह्यातील विविध भागांतून ७० उमेदवारांनी सहभाग नोंदविला , पैकी २४ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आल्याची माहिती कंपनी प्रतिनिधींनी दिली.
            त्यानंतर १७ मार्च रोजी पालघर येथील पागधरे इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित दुसऱ्या भरती शिबिरात 
 ४० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली. या ठिकाणी १०३ उमेदवारांनी सहभाग घेतला, पैकी ३४ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
           दोन्ही ठिकाणी उर्वरित रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू राहणार असून पात्र इच्छुक उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर येथे संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
             पजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर तसेच मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित संस्थांचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave Your Comments