जव्हार प्रकल्पाचा दहावीचा निकाल ; मुलींची पुन्हा बाजी, १६ शासकीय व ३ अनुदानित आश्रमशाळांचा १००% निकाल

Date: 2026-05-21
news-banner
नवयुग पालघर 

**जव्हार प्रकल्पाचा दहावीचा निकाल ; मुलींची पुन्हा बाजी, १६ शासकीय व ३ अनुदानित आश्रमशाळांचा १००% निकाल**

 आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचा इयत्ता दहावी ( २०२५-२६) निव्त्लात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. शासकीय व अनुदानित अशा दोन्ही गटांचा निकाल एकत्रित पाहता अनेक शाळांनी शंभर टक्के यश संपादन केले असले तरी काही शाळांचा निकाल चिंताजनकरीत्या घसरल्याचे चित्र समोर आले आहे.

एकूण निकाल : 
अनुदानित आश्रमशाळा : एकूण १०५७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९२६ उत्तीर्ण, तर १३१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. एकूण निकाल ८६.८६ टक्के लागला.
शासकीय आश्रमशाळा : एकूण निकाल ९१.१३ टक्के नोंदवला गेला आहे. प्रकल्पातील एकूण १०६८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले. यात
 देहरे, झाप, साकुर (मुली), सुर्यमाल, कारेगाव, पळसुंडे, भोपोली, मुरबाड, साखरे, कावळे, कुर्झे, पाली आणि गुंज(बुधावली) या १३ शाळांनी शंभर टक्के निकाल नोंदवत विशेष यश मिळविले.

शास. आश्रमशाळा शालानिहाय निकाल : 
देहरे, झाप, साकुर (मुली), सुर्यमाल, कारेगाव, पळसुंडे, भोपोली, मुरबाड, साखरे, कावळे, कुर्झे, पाली, गुंज १००%
गुहीर ९८.७८%, हिरवे ९८.५७%, गोंदे व कहे प्रत्येकी ९८.४३%, घानवळ ९७.४३%, ओझर ९७.२९%, दाभोसा ९७.१८%, न्याहाळे ९६.०७%, आगवान ९६.१३%, गारगाव ९५.४०%, चास ९४.८७%,आमगाव ९४.४४%,वांगणी ९३.१७%, ऐना ९२.३०%, नांदगाव ८८.३७%, दाभेरी ८८.१५%, तर विनवल ७३.४०%

 अनुदानित आ. शाळांचा शालानिहाय निकाल (उतरत्या क्रमाने) :
आडोशी, तलवाडा, माण १००%, चालतवड ९८.११%, हिरडपाडा ९५.०६%, आसे ९२.६८%, चाबके तलावली ९२.३०%, आंबिस्ते ९२.१५%, दादडे ८९.९३%, भारती विद्यापीठ जव्हार ८९.७९%, विक्रमगड ८५.७१%, परळी ८३.८३%, मोखाडा ८३.७८%, नांदणी गायगोठा ७५.९२%, चांभारशेत ६२.७९%, देवगाव ४७.४२%, तर वावर ४५.२३%

मुलींची पुन्हा बाजी
शास. आश्रमशाळा(मुलींचा निकाल)
देहरे, झाप, साकुर, हिरवे, सुर्यमाल, गोंदे, कारेगाव, पळसुंडे, चास, भोपोली, मुरबाड, साखरे, कावळे, कुर्डे, पाली, गुंज १००%,
गुहीर ९७.७७%, दाभोसा ९७.५६%, गारगाव ९७.४३%, कहे ९६.५५%, न्याहाळे ९५.७४%, ओझर ९५.१२%, आगवान ९५%, घानवळ ९३.७५%, दाभेरी ९१.४२%, वांगणी ९०.९०%, नांदगाव ९०%, ऐना ८७.५०%, तर विनवल ७२.५५%

    अनु. आश्रमशाळा (मुलींचा निकाल):
आडोशी, तलवाडा, माण, भारती विद्यापीठ जव्हार १००%, आंबिस्ते ९६.१५%, चालतवड ९६.६६%, विक्रमगड ९६%, हिरडपाडा ९५.५५%, मोखाडा ९५.२३%, चाबके तलावली ९४.४४%, दादडे ९३.१८%, आसे ९०.९०%, परळी ९०%, नांदणी गायगोठा ७८.५७%, चांभारशेत ७४.०७%, देवगाव ६०.६१%, तर वावर ५०%

      अनुदानित गटात मुलांचा निकाल ८५.८७%, तर मुलींचा ८९.३५% लागला. त्यामुळे मुलींचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले.

नापास विद्यार्थ्यांचे चित्र
         शासकीय : विनवल येथे सर्वाधिक २५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. दाभेरी ९, नांदगाव ५, न्याहाळे-वांगणी-गारगाव प्रत्येकी ४, दाभोसा-ओझर-ऐना-गोंदे-चास-आगवान प्रत्येकी २, हिरवे-घानवळ-कहे-गुहीर प्रत्येकी १ विद्यार्थी नापास.
      देहरे, झाप, साकुर, सुर्यमाल, कारेगाव, पळसुंडे, भोपोली, मुरबाड, साखरे, कावळे, कुर्डे, पाली आणि पुंज येथे एकही विद्यार्थी नापास नाही.

अनुदानित
 वावरमध्ये सर्वाधिक २३ विद्यार्थी नापास झाले.चांभारशेत, दादडे, परळी प्रत्येकी १६, देवगाव व नांदणी गायगोठा प्रत्येकी १३, विक्रमगड ७, मोखाडा ६, भारती विद्यापीठ ५, आंबिस्ते-चाबके तलावली-हिरडपाडा प्रत्येकी ४, आसे ३, चालतवड १ विद्यार्थी अनुत्तीर्ण.
      आडोशी, तलवाडा व माण येथे एकही विद्यार्थी नापास नाही.
       एकूण चित्र - यंदाच्या निकालात शासकीय गटात १३ तर अनुदानित गटात ३ अशा एकूण १६ आश्रमशाळांनी शंभर टक्के निकाल नोंदवला. मुलींनी दोन्ही गटांत आघाडी कायम राखली.

Leave Your Comments