पालघर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांत सत्तासमीकरण स्पष्ट :
९४ पैकी
भाजप ५०,
शिवसेना शिंदे २६,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार १०,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ४,
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ३ आणि काँग्रेस १
पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार व पालघर या तीन नगरपरिषदांबरोबरच वाडा नगरपंचायतीसाठी एकूण ९४ नगरसेवक निवडून द्यावयाचे होते. यासाठी तब्बल ३१६ उमेदवार रिंगणात होते. निकालांमध्ये ९४ पैकी भाजपचे सर्वाधिक ५० उमेदवार विजयी झाले, तर त्याखालोखाल शिवसेना (शिंदे पक्ष) २६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) १०, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष) ३ आणि काँग्रेसचा १ उमेदवार निवडून आला.
डहाणू नगरपरिषदेत २७ सदस्य पदांसाठी ६५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपचे सर्वाधिक १७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चे ८ तर शिवसेना शिंदे पक्षाचे २ उमेदवार निवडून आले.
जव्हार नगरपरिषदेत २० सदस्य पदांसाठी ६९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी भाजपचे सर्वाधिक १४ उमेदवार निवडून आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष) चे ३, शिवसेना (शिंदे पक्ष) चे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चा १ सदस्य निवडून आला.
पालघर नगरपरिषदेत ३० सदस्य पदांसाठी ११५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये शिवसेना (शिंदे पक्ष) चे सर्वाधिक १९, भाजपचे ८ तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) चे ३ उमेदवार निवडून आले.
वाडा नगरपंचायतीत १७ सदस्य पदांसाठी ६७ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपचे सर्वाधिक ११, शिवसेना (शिंदे पक्ष) चे ३, काँग्रेस पक्षाचा १, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चा १ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) चा १ सदस्य निवडून आला.