इ.११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी पालघरमध्ये मार्गदर्शन केंद्र सुरू

Date: 2026-05-21
news-banner
नवयुग पालघर 

**इ.११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी पालघरमध्ये मार्गदर्शन केंद्र सुरू**

           पालघर जिल्ह्यातील इयत्ता ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मार्गदर्शन केंद्र स्थापन केले असून या केंद्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.

            २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यभर राबविण्यात येणार्‍या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पाश्र्वभूमीवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरणे, नोंदणी करणे, पसंतीक्रम निश्चित करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान उद्‌भवणार्‍या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी या केंद्रावर मदत मिळणार आहे. 
            पालघर जिल्ह्यासाठी टेंभोडे येथील यशवंत चाफेकर ज्युनिअर कॉलेज येथे मार्गदर्शन केंद्र निश्चित करण्यात आले असून, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) चतुर पाटील आणि माधव मते यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

       प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील शंका, अडचणी अथवा तांत्रिक समस्यांसाठी विद्यार्थी आणि पालकांनी मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

Leave Your Comments