किल्ले, कला व वाचन संस्कारांचा संगम सह्याद्री मित्र परिवार व मयूर वाचनालय यांचा संयुक्त पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात माकुणसार, दि. २१ डिसेंबर :

Date: 2025-12-24
news-banner
किल्ले, कला व वाचन संस्कारांचा संगम
सह्याद्री मित्र परिवार व मयूर वाचनालय यांचा संयुक्त पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
माकुणसार, दि. २१ डिसेंबर :

https://youtu.be/T5E6PrL1Rfo?si=4Ds8Zb7D9rF3fZ-k

दिवाळी सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये इतिहासप्रेम, कलागुणांना चालना आणि वाचनसंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने सह्याद्री मित्र परिवार व मयूर वाचनालय, माकुणसार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी मयूर वाचनालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात किल्ले बांधणी, रंगभरण, चित्रकला, निबंध व हस्ताक्षर स्पर्धांतील एकूण ७० विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
सह्याद्री मित्र परिवाराच्या वतीने माकुणसार, केळवे व मथाणे या तीन विभागांमध्ये विभागवार किल्ले बांधणी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तर मयूर वाचनालयाच्या वतीने शालेय स्तरावर विविध शैक्षणिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही उपक्रमांचा संयुक्त गौरव सोहळा पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रंगतदार वातावरणात पार पडला.
शालेय स्पर्धांतील विजेते :
मयूर वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या रंगभरण, चित्रकला, निबंध व हस्ताक्षर स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या एकूण ३५ विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
किल्ले बांधणी स्पर्धेतील विजेते :
माकुणसार विभाग –
देवाची डोंगरी (राजगड प्रतिकृती) प्रथम,
ब्राह्मणआळी (माहुली किल्ला प्रतिकृती) द्वितीय,
राऊतवाडी (मुरुड जंजिरा प्रतिकृती) व शिवाजीनगर (विजयदुर्ग प्रतिकृती) संयुक्त तृतीय.
केळवे विभाग –
भरणेपाडा (प्रतापगड प्रतिकृती) प्रथम,
बंदरपाखाडी – शिवाजी जिम्को ग्रुप द्वितीय,
अर्णव–यश्वी गट तृतीय.
मथाणे विभाग –
संस्कृती रक्षक टीम प्रथम,
रामकुटीर गडसंवर्धन टीम द्वितीय,
विहाना राऊत तृतीय.
सर्व विजयी संघांना आकर्षक सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्रे देऊन प्रोत्साहन देण्यात आले. मयूर वाचनालयाच्या वतीने ३५ तर सह्याद्री मित्र परिवाराच्या वतीने ४५ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
किल्ले बांधणी स्पर्धेची सन्मानचिन्हे केळवे लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन कृषिल वर्तक यांच्या सौजन्याने देण्यात आली. यावेळी त्यांनी सह्याद्री मित्र परिवाराच्या गडकोट संवर्धन उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास लायन दिलीप, लायन हर्षल राऊत व लायन चेतन सावे हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी सह्याद्री मित्र परिवार व मयूर वाचनालयचे दीपक पाटील, राजेश वैद्य, शिरीष ठाकूर, उमेश पाटील, निकेश पाटील, गौरव राऊत, सारिका पाटील, रुपेश पाटील, अरविंद पाटील, तुषार ठाकूर, गौरव पाटील, निकेत पाटील, भद्रेश म्हात्रे व तेजस ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश वैद्य यांनी केले, तर आभार प्रदर्शन सह्याद्री मित्र परिवाराचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी मानले.

Leave Your Comments