आचार्य भिसे गुरुजी जीवनगौरव पुरस्काराचा प्रथम मान डॉ. नंदकुमार वर्तक यांना

Date: 2026-06-26
news-banner
नवयुग पालघर

**आचार्य भिसे गुरुजी जीवनगौरव पुरस्काराचा प्रथम मान डॉ. नंदकुमार वर्तक यांना**

                आदिवासी समाजाचे कैवारी, महान शिक्षणतज्ज्ञ, थोर स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक आचार्य भिसे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सु. पे. ह. हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, बोर्डी यांच्या वतीने प्रथमच “आचार्य भिसे गुरुजी जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे.
                 २०२६ चा पहिला जीवनगौरव पुरस्कार नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक बांधिलकी जपणारे मा. डॉ. नंदकुमार सदाशिव वर्तक (बोईसर) यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जाहीर करण्यात आला आहे.
             हा पुरस्कार वितरण सोहळा आचार्य भिसे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता एस. आर. सावे कॅम्पिंग ग्राऊंड, बोर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, विशेष अतिथी म्हणून आय.आर.एम.चे संस्थापक डॉ. श्रीकांत सांब्राणी तसेच माजी विद्यार्थी संघाचे आद्य संस्थापक एन. के. पाटील उपस्थित राहणार असूनकार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सु. पे. ह. हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. अविनाश सावे भूषविणार आहेत.
                 वआचार्य भिसे गुरुजी यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रसेवेच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे.     
                या सोहळ्यास माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सु. पे. ह. हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, बोर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे..

Leave Your Comments