पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा : ३० उमेवारांची प्राथमिक निवड

Date: 2026-06-29
news-banner
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा : ३० उमेवारांची प्राथमिक निवड
              जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर यांच्या वतीने २४ जून रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह अर्थात रोजगार मेळाव्यात चार नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून एकूण ११० रिक्त पदांसाठी मुलाखत प्रक्रिया राबविली. जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या एकूण १७७ उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ३० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून 
५ उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे.
या रोजगार मेळाव्यात ब्लू स्टार लिमिटेड, एशिअन पेंटस, इंटरनॅशनल वायरनेटिंग इंडस्ट्रीज आणि युनिकेअर हेल्थ केअर या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
        या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एकलव्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालघर, रोजगार मेळावा समन्वय समिती सदस्य तसेच जिल्हा कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रोजगार मेळावा नोडल अधिकारी रविंद्र सुरवसे व सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

Leave Your Comments