एकल महिलांच्या हक्क-सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

Date: 2026-06-29
news-banner
नवयुग पालघर 

**एकल महिलांच्या हक्क-सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न**
              एकल महिलांचे हक्क संरक्षण, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण तसेच शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, पालघर आणि जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एकल महिला धोरण” विषयक जिल्हास्तरीय कार्यशाळेत राज्य शासनाच्या एकल महिला धोरणाची उद्दिष्टे, एकल महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्यांच्या अधिकारांचे संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
              कार्यशाळेदरम्यान एकल महिलांच्या समस्या, गरजा आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक बाबींवर विचारमंथनही करण्यात आले.
           यावेळी व्यंकटराव हुंडेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास); विवेक चौधरी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी; रतिंद्र प्रकाश सुनसे, कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी; संतोष प्रकाश पाटील, जिल्हा समन्वयक (प्राथमिक शिक्षण विभाग); प्राजक्ता नामदेव पानसरे, समाजकल्याण अधिकारी; अशोक पाटील, शिक्षण अधिकारी (माध्यमिक); संभाजी भोजने, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET); संभाजी पवार, संरक्षण अधिकारी; राजकन्या आडोळे, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, पालघर; डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी; प्रदीप के. सहारे, पुकार संस्था; श्रुतिका वसंत शितोळे, सदस्य कार्यकारी संचालक, पुकार संस्था व मिशन वात्सल्य, विक्रमगड; तसेच जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, विनोद राठोड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महिला प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave Your Comments