कुणबी समाजाच्या सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
कुणबी समाजातील विविध शैक्षणिक स्तरांवर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका (पूर्व विभाग) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत रामचंद्र सातवी यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन ऍड प्रणव अशोक सूर्यवंशी (खामलोली) यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून भालचंद्र गणपत पाटील (चहाडे), सुनिल भाऊ शेलार (कोकणेर) व चंद्रशेखर कोंडू नाईक (दहिसर) उपस्थित होते.
विशेष निमंत्रित मार्गदर्शक कुणाल अशोक ठाकूर (B.E., Head of Information Technology), प्रमुख पाहुणे सन्मा. ॲड. प्रणय रविंद्र घरत (नानिवली) तसेच प्रमुख मार्गदर्शक सन्मा. प्रा संजय दाजीबा घरत (निवृत्त पर्यवेक्षक, एम. के. ज्युनिअर कॉलेज, चिंचणी) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा आणि उज्ज्वल भवितव्य घडविण्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो व समाजाच्या प्रगतीला चालना मिळते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी विविध दानशूर व्यक्तींनी उदार हस्ते निधी उपलब्ध करून दिला. उद्घाटक सन्मा. ॲड. प्रणव अशोक सूर्यवंशी यांनी स्व. ॲड. अमृत पांडुरंग अधिकारी यांच्या स्मरणार्थ मंडळासाठी ₹५५,५५५/- शैक्षणिक निधी प्रदान केला. भालचंद्र गणपत पाटील, सुनिल भाऊ शेलार व चंद्रशेखर कोंडू नाईक यांनी प्रत्येकी ₹१७,०००/- असा एकूण ₹५१,०००/- निधी कुणबीरत्न पुरस्कारासाठी दिला.
विशेष मार्गदर्शक कुणाल अशोक ठाकूर यांनी ₹११,०००/- शैक्षणिक निधी, तर प्रमुख पाहुणे ॲड. प्रणय रविंद्र घरत यांनी ₹१०,०००/- निधी प्रदान केला.
तसेच मंडळाचे आद्य संस्थापक व माजी अध्यक्ष समाजभूषण आदरणीय राजाराम गोविंद पाटील यांच्याकडून ₹५,०००/- वाढीव शैक्षणिक निधी प्राप्त झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे विद्यमान विश्वस्त चेतन पाटील, उल्हास सातवी, मनोज ठाकूर, माजी अध्यक्ष मार्तंड पाटील, अविनाश पाटील, ज्ञातीचे अध्यक्ष यदुनाथ पाटील, जगदीश पाटील, उद्योजक मनोज अधिकारी, माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर अधिकारी, विद्यमान व माजी पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक मंडळाचे चिटणीस वैभव नारायण पाटील यांनी केले.