शालेय राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत पुणे विभागाच्या मुलांचा, नाशिक विभागाच्या मुलींचे वर्चस्व
पालघर, दि. २८ डिसेंबर :
सफाळे येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय १९ वर्षांखालील मुला–मुलींच्या बेसबॉल स्पर्धांनी राज्यातील क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले. डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था, सफाळे येथे 1 २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये मुलांच्या गटात पुणे विभागाने तर मुलींच्या गटात नाशिक विभागाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धांमध्ये मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, पुणे, लातूर व अमरावती या आठही विभागांतील संघांनी सहभाग नोंदवत चुरशीच्या लढती साकारल्या. उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, संघभावना व शिस्तबद्ध खेळामुळे प्रत्येक सामना उत्कंठावर्धक ठरला.
उद्घाटन सोहळा उत्साहात
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, डॉ. अमृते शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष खांतीलाल दोशी, सरचिटणीस ॲड. दीपक भाते, प्राचार्या मधुमती कुलकर्णी व मुख्याध्यापिका सुचिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडास्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असे प्रतिपादन केले.
यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक (चौकट)
पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत ,
“अशा राज्यस्तरीय स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. खेळातून शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात,” असा संदेश दिला .
जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांची प्रतिक्रिया (चौकट)
पालघर जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्तरावर बेसबॉल स्पर्धेचे आयोजन झाले.“शालेय स्तरावरील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची संधी जिल्ह्याला लाभली ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे सांगून भविष्यात या स्पर्धांतून राज्य व देशाला दर्जेदार खेळाडू मिळतील,” अशी आशा जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी व्यक्त केली . त्यांनी आयोजक संस्था, क्रीडा संघटना, पंच, प्रशिक्षक, स्वयंसेवक व खेळाडूंच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरल्याचे सांगितले.
अंतिम निकाल
मुले – १९ वर्षांखालील
🥇 प्रथम : पुणे विभाग
🥈 द्वितीय : कोल्हापूर विभाग
🥉 तृतीय : नाशिक विभाग
चतुर्थ : मुंबई विभाग
मुली – १९ वर्षांखालील
🥇 प्रथम : नाशिक विभाग
🥈 द्वितीय : नागपूर विभाग
🥉 तृतीय : अमरावती विभाग
चतुर्थ : कोल्हापूर विभाग
समारोप व पारितोषिक वितरण
समारोप समारंभात विजेत्या व उपविजेत्या संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष इंद्रजित नितमवार, तांत्रिक समिती प्रमुख अशोक सरोदे, राज्य समन्वयक प्रितीश पाटील, आशिष पाटील, नितीन म्हात्रे, संपदा चौधरी, रमाकांत घरत, जतिन कदम, अंजली लाडे, अनिलकुमार वझे, प्रियंका पाटील, उपप्राचार्या सुजाता घरत यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्र संघ (१९ वर्षांखालील) निवड
मुले :
मंगेश राऊत (पुणे), श्रीवर्धन बनसोडे (कोल्हापूर), विरेन माने (कोल्हापूर), युवराज कुशवाह (मुंबई), अनिल गवळी (नाशिक), लकी चाकार (अमरावती), यश गोरे (मुंबई), हर्ष धनमेहेर (मुंबई), राजवर्धन शिरसाट (पुणे), प्रताप पाटील (पुणे), श्रेयश राठोड (अमरावती), आकाश गारडे (पुणे), वेदांत राऊत (मुंबई), विभीषण चव्हाण (छ. संभाजीनगर), वंश चव्हाण (कोल्हापूर), अयान शेख (लातूर).
राखीव : चंदन झाळके, हितेश सतरे, ध्रुव राजपूत, कौस्तुभ साळुंके, पार्थ जाधव.
मुली :
नेहा जाधव, तक्षिला जाधव, ऋतुजा जाधव (नाशिक), शीला सोनवणे (नागपूर), संजीवनी समदुरे (अमरावती), गौरी जाधव, प्रगती ठोंबरे (कोल्हापूर), सई चव्हाण, समृद्धी गाडेकर, प्रणिता कणसे (पुणे), राजनंदिनी कुमडाले, सुधा शिंदे (लातूर), प्रांजली चौरे, राजश्री गाडेकर (छ. संभाजीनगर), मानसी गायकवाड (मुंबई).
राखीव : रूप कुमारी महातो, मीरा शाहू, भाग्यश्री रुसले, स्वराली मांजरे, प्रतीक्षा राठोड.