https://youtu.be/ncYf94U37kI?si=gT8vdjCFbRirvgM-
बोईसरमध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्सवर गोळीबार, आरोपी फरार
पालघर : बोईसर येथील गणेशनगर भागात चतुर्भुज ज्वेलर्स या दुकानावर चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे.चोरांनी दुकानदारावर पिस्तुलातून गोळीबार केला. मात्र प्रसंगावधान दाखवत, दुकानदार खाली वाकल्याने गोळी बाजूने निघून गेली व बचावला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील इतर दुकानदारांनी घटनास्थळी धाव घेतली. वाढती गर्दी पाहून चोरांनीपिस्तुल जागेवरच फेकून पलायन केले.
दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. चोर मोटरसायकलवरून आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. पोलीस यंत्रणा एकता दौड कार्यक्रमात गुंतलेली असल्याचे विचारात घेऊन, चोरट्यांनी संधी साधण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे.