पालघर पोलिसांकडून २०४ किलो गांजाचा नाश
१८ गुन्ह्यांमधील जप्त अंमली पदार्थांचा अधिकृतरीत्या नाश
पालघर : पालघर जिल्हा पोलीस दलाकडून अंमली पदार्थविरोधात निर्णायक कारवाई करत १८ गुन्ह्यांमधील जप्त २०४ किलो ७८ ग्रॅम गांजाचा नाश करण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर गठीत समितीच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. या समितीत अध्यक्ष म्हणून पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, सदस्य म्हणून अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) रविंद्र नाईक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांचा समावेश होता.
१६ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राष्ट्रीय स्तरावर अंमली पदार्थ नाश मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या अंमली पदार्थ संबंधित गुन्ह्यांचा समितीने आढावा घेतला. तरतुदीनुसार नाशास पात्र ठरविण्यात आलेल्या १८ गुन्ह्यांतील गांजाचा नाश ३० सप्टेंबर रोजी करण्यात आला. ही कारवाई मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. तळोजा (जि. रायगड) येथील प्लांटवर करण्यात आली.
या वेळी अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रलाल रविंद्र नाईक, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, श्रे. पोलीस उपनिरीक्षक राजेश वाघ, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस मुख्यालयाचे अधिकारी–अंमलदार, संरक्षण गार्ड, वजनकाटा धारक,ब उपस्थित होते.