करिअर कट्टाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विवा महाविद्यालयाने उत्कृष्ट राज्यस्तरीय प्रथम महाविद्यालय हा मान पटकावत तब्बल ११ पुरस्कारांवर मोहोर उमटवली. राज्यात सर्वाधिक पुरस्कार प्राप्त करणारे महाविद्यालय म्हणून विवा कॉलेजने आपली गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली.
🏆 पुरस्कारांची क्रमवार नोंद
भास्कर वामन ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स, यशवंत केशव पाटील कॉलेज ऑफ कॉमर्स व विद्या दयानंद पाटील कला महाविद्यालय (विवा कॉलेज) – उत्कृष्ट राज्यस्तरीय प्रथम महाविद्यालय
डॉ. दीपा वर्मा – उत्कृष्ट विभागीय समन्वयक
मुंबई विभाग – प्रथम क्रमांकाचे उत्कृष्ट विभागीय महाविद्यालय
उत्कृष्ट करिअर संसद
जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय
राज्यस्तरीय रिल स्पर्धा २०२५ – भावेश विधाते (प्रथम क्रमांक)
अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस करिअर टूर (Amazon Web Services – AWS Career Tour) – राज्यस्तरीय प्रथम क्रमांक
अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस करिअर टूर (Amazon Web Services – AWS Career Tour) – जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक
जिल्हास्तरीय रिल स्पर्धा – विजेतेपद
जिल्हास्तरीय रिल स्पर्धा – भावेश विधाते (प्रथम)
पालघर जिल्हास्तरीय रिल स्पर्धा – चिन्मय भोईर (द्वितीय क्रमांक)
तसेच अमेझॉन वेब सर्व्हिसेस विभागीय पातळीवरील स्पर्धा (Amazon Web Services – AWS Competition) मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही महाविद्यालयाने पटकावले.
राज्यस्तरीय सोहळा मुंबईत उत्साहात
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सेंट झेवियर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
“विकसित भारत २०४७ : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका” या विषयावरील एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या औचित्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भूषविले.
यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. करुणा गोकर्ण, विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. अतुल साळुंखे, स्नेहा जगदाळे, डॉ. बबन सिनगारे, डॉ. अनुश्री किणी, डॉ. वैभव सातवी, सहाय्यक प्राध्यापक विनोद डीडवाना, सहाय्यक प्राध्यापक विकास गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
गौरवचिन्ह प्रदान; अभिनंदनाचा वर्षाव
मान्यवरांच्या हस्ते विवा महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या यशामुळे महाविद्यालयाचे नाव राज्यभर उजळले असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उत्कृष्ट यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर, व्यवस्थापन समिती सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस. एन. पाध्ये, समन्वयक नारायण कुट्टी, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे तसेच विद्यार्थी, पालक व माजी विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.
राज्यस्तरीय ‘प्रथम’चा मान पटकावत ११ पुरस्कारांची कामगिरी करून विवा महाविद्यालयाने गुणवत्ता, सातत्य आणि कर्तृत्वाची भक्कम छाप राज्यभर उमटवली आहे.