पालघर नगरपरिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर : १५ प्रभागातून ३० सदस्य निवडून देणार
पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली असून यावेळी १४ प्रभागातून ३० सदस्यांची म्हणजेच नगरसेवकांची निवड होणार आहे.या प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य निवडून दिले जाणार आहेत.
२०११ च्याजनगणनेनुसार पालघर नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्या ६८९३० असून अनुसूचित जातीची लोकसंख्या ३४१९ इतकी तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ९७२० आहे.
पालघर नगरपरिषदेची अंतिम प्रभाग रचना :
पालघर नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक तक्रारी झाल्या व आक्षेपही नोंदवले गेले. आता अंतिम प्रभाग रचनेत दोन-तीन बदल करण्यात आले असून यामध्ये खाणपाडा प्रगणक ७०, प्रभाग क्रमांक ०६ मधून काढून प्रभाग ०९ मध्ये घेण्यात आले आहे. तर प्रगणक क्रमांक १०७ व ११२ देखील प्रभाग क्रमांक ०६ मधून काढून प्रभाग ०५ मध्ये घेण्यात आले आहेत.प्रगणक ११६,१२३ व १२४ प्रभाग क्रमांक ५ मधून काढून प्रभाग क्रमांक ०६ मध्ये घेण्यात आले आहेत.
नवली गाव नवली आणि लोकमान्यनगर अशा दोन भागात विभागले गेले आहे. प्रभाकर पाटील ते मनोज घरत यांच्या घरापर्यंतचा भाग प्रभाग क्रमांक १४ लोकमान्य नगरमध्ये असून यामध्ये नवल नगर ,भोगलेपाडा एक व दोन समाविष्ट आहेत तर उर्वरित नवली गावाचा भाग प्रभाग क्रमांक ०४मध्ये समाविष्ट आहे.
प्रभागनिहाय लोकसंख्या व समाविष्ट क्षेत्र खालीलप्रमाणे :
*प्रभाग -१, लोकसंख्या :- ४४०९,
अ.जा. ७५, अ.ज. ३६२
समाविष्ट भाग :- गांधीनगर, जैन मंदिर, हिंदू स्मशाणभूमी पालघर, डुंगीपाडा माळीगॅरेज, कब्रस्तान, श्एEँ ऑफिस, मच्छी मार्केट चाररस्ता पोलीस चौकी, शासकीय रेस्टहाऊस.
*प्रभाग -२,लोकसंख्या - ४७९७
अ.जा. - २७७, अ.ज. - १४८३
समाविष्ट भाग :- जि.प. शाळा वेवूर, गणेश नगर, जुने जीएसटी कार्यालय, शक्ती उद्योग औद्योगिक वसाहत, घोलवीरा, विरेंद्र नगर
*प्रभाग -३, लोकसंख्या - ४८३०
अ.जा. २६७, अज १२९१
समाविष्ट भाग :- सेंट जॉनकॉलेज, वन विभाग कार्यालय, भेंडीपाडा ग्राऊंड, जिवनज्योतहॉस्पिटल, हनुमान टेकडी, साईबाबा मंदिर, पृथ्वी आनंद वसाहत, पुनम पार्क वसाहत.
*प्रभाग -४, लोकसंख्या -४५६३
अ.जा. - ५५९, अ.ज. - ७६७
समाविष्ट भाग :- डॉ. आंबेडकर नगर पूर्व, नत्रली, इस्कॉन मंदिर, सिध्दी विनायक रेसिडेन्सी वसाहत.
*प्रभाग - ५, लोकसंख्या -४६२८
अ.जा. - ५२, अ.ज. - २७०
समाविष्ट भाग :- गणेशकुंड, धनानी मोटर्स, रामकृष्णगार्डन वसाहत, रिलायन्स मॉल, नानीवडेकर हॉस्पिटल, आयडीबीआय बैंक, हुतात्मा चौक, पालघर मेडीकल स्टोअर्स इमारत, भाजी मार्केट, टिंक्कल स्टार हायस्कुल, बजलीपाडा, विमल कॉम्प्लेक्स, दशरथसिंह नगर, ओम शांती निकेतन इमारत
*प्रभाग - ६, लोकसंख्या -४४६९
अ.जा. - ४९, अ.ज. - १२३
समाविष्ट भाग :- जुना पालघर, आगरी पाडा, देत्रिसहाय रोड, गावदेवी आंबेवाडी, किणी नगर, शुक्लाकंपाऊंड, कुंती पार्क, मधुबन इमारत, मारुती धाम, महावीर दर्शन, गावडे चाळ, वात्सल्य इमारत, किशोरकुंज इमारत, कंचन वाटीका सोसायटी, मोतीमहळ, सत्यम्, शिवम, सुंदरम इमारत.
*प्रभाग - ७, लोकसंख्या -४१८८
अ.जा. - ३६८, अ.ज. - १२५२
समाविष्ट भाग :- एस.टी. वर्क शॉप, ढवळे हॉस्पिटल, जीवन विकास शाळा, गोठणपुर, कॉलेज रोड, आनंदाश्राम शाळा, अयप्पा मंदिर, पिलेनानगर, जि.प. शाळा, गोठणपूर.
*प्रभाग - ८, लोकसंख्या -४८८३
अ.जा. - २०३, अ.ज. - ५४९
समाविष्ट भाग :- अल्याळी गाव, बंधन रिसॉर्ट,गणेशनगर,टेंभोडे गाव, चाफेकर व दांडेकरकॉलेज, हावरे वसाहत,
*प्रभाग - ९, लोकसंख्या -५०४०
अ.जा. - ४१४, अ.ज. - ६५१
समाविष्ट भाग :-नवापाडा, वळणनाका, शिक्षक पतपेढी, हिंदवी मैदान, अल्याळी औदयोगिकवसाहत,
*प्रभाग - १०, लोकसंख्या -४८२८
अ.जा. - १२१, अ.ज. - १७७
समाविष्ट भाग :-हॉलिस्पिरीटहायस्कूल, फिली आहॉस्पिटल, प्Dइण् बैंक, वृंदावन पार्क वसाहत, अष्टविनायक गार्डन, साईनगर,
*प्रभाग - ११, लोकसंख्या -४५२६
अ.जा. - २१८, अ.ज. - २१४
समाविष्ट भाग :- वीर सावरकर चौक, नाना नानी पार्क क्रोमा, कुलदीप नगर, विष्णु नगर
*प्रभाग - १२, लोकसंख्या -४३७४
अ.जा. - १८४, अ.ज. - २४७
समाविष्ट भाग :-आर्यन हायस्कूलग्राऊंड, मिडल क्लास सोसायटी, कमलापार्क, संखेकॉलनी, विजय नगर, मोरे भंडारी समाज हॉल, लक्ष्मी नारायण मंदिर, यश अपार्टमेंट, मनी नगर, गंगा अपार्टमेंट, जानकी अपार्टमेंट
*प्रभाग - १३, लोकसंख्या -४६५७
अ.जा. - १९२, अ.ज. - ३०६
समाविष्ट भाग :-शुक्लाकंपाऊंड, हुताम्ता स्तंभ, तिवारी कंपाऊंड, लायन्स क्लब इमारत, बाजपेयी वाडा, आर्यन हायस्कूल, ग्रामीण रुग्णालय, वर्दे चाळ, मेघना नर्सिंग होम, चितामणी अपार्ट, वैष्णवी अपार्टमेंट, केशवराज अपार्टमेंट, श्रीराम नगर, स्टेट बैंक, प्रकाश टॉकीज,.
*प्रभाग - १४, लोकसंख्या -४४८०
अ.जा. - २३०, अ.ज. - ८७२
समाविष्ट भाग :- नवली तलाव, नवल नगर, भौगोले पाडा, वृंदावन, विवा स्वरगंगा वसाहत, रेल्वे लाईन, रेल्वे कॉलनी, रेल्वे सब पॉवर स्टेशन, शापरीया रोहाऊस, लोकमान्य नगर,
*प्रभाग - १५, लोकसंख्या -४५२८
अ.जा. - २१०, अ.ज. - ११५६
समाविष्ट भाग :- उपविभागीय कृषी अधिकारीकार्यालय,आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह,जिल्हा न्यायालय, मोहपाडा, स्टेट जी.एस.टी कार्यालय, आयकर विभाग.